शिवसेना एकसंघ होणार? दीपक केसरकरांची आपल्या वक्तव्यावर भावनिक रिएक्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 11:45 AM2023-01-02T11:45:27+5:302023-01-02T11:46:27+5:30
काल शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट आगामी काळात एकसंघ होण्याचे संकेत दिले होते. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या.
काल शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी शिंदे गट आणि ठाकरे गट आगामी काळात एकसंघ होण्याचे संकेत दिले होते. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात शिवसेना एकत्र येणार अशा चर्चा सुरू झाल्या. यावर आता मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
'पैशाने जर राज्य बदलत असेल तर उद्योजकांनीच राज्य केले असते. काही कारण असतात त्यामुळे लोक दुख:वतात. राजकारणा पलिकडे जाऊन मैत्री असते. आपल्या आजुबाजूची लोक असतात, ती चुकीची माहिती देत असतात. मी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराबरोबर गेलो. मला पर्रिकर साहेब पंतप्रधानाच्याकडे भेटायला जात होते.
'दोन दिवसापूर्वी माझी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे भावनेच्या भरात बोलले. ते आमच्यातील बोलण चार भिंतीच्या आतमध्ये होते. यावेळी मी भावनिक झालो होतो, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
... मग, शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही; शिंदेंच्या प्रवक्त्यांनी दिले एकीचे संकेत
दीपक केसरकर काय बोलले होते?
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काल मंत्री दीपक केसरकर शिर्डी येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आगामी काळात एकसंघ होण्याचे संकेतही दिले आहेत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा लढा लढवला, ती लोकं अशी सहजासहजी सोडून जात नाहीत. काहीतरी निश्चितपणे असं घडलंय, ज्यामुळे ही लोकं बाहेर पडली. ते काय घडलं याचं आत्मपरिक्षण जसं मी केलं पाहिजे, तसं आमच्या तेव्हाच्या पक्षप्रमुखांनीही करायला हवं. तसं झाल्यास शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटले.