‘डम्पिंग’चा विषय पुन्हा पेटणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 02:30 AM2018-09-21T02:30:36+5:302018-09-21T02:30:39+5:30
अंधेरी पश्चिम, सांताक्रूझ, वांद्रे या विभागातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या ठेकेदाराबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीने रोखून ठेवले आहेत.
मुंबई : अंधेरी पश्चिम, सांताक्रूझ, वांद्रे या विभागातील कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या ठेकेदाराबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीने रोखून ठेवले आहेत. त्यामुळे संतप्त पालिका आयुक्तांनी सर्वच प्रस्ताव मागे घेण्याची तयारी केली होती. प्रत्यक्षात हे प्रस्ताव पुन्हा एकदा स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात येणार आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासन पुन्हा एकदा आमनेसामने येणार असून सत्ताधारी यावर काय भूमिका घेणार, याविषयी उत्सुकता वाढली आहे.
गेल्या काही बैठकांमध्ये कचºयाचे प्रस्ताव स्थायी समितीने रोखले आहेत. यामध्ये के-पश्चिम विभाग, एच-पूर्व आणि एच-पश्चिम या विभागांमधील कचरा उचलण्याच्या कामाचा समावेश
आहे. मात्र सत्ताधारी शिवसेनेने या प्रस्तावांना मंजुरी दिली नाही. यामुळे संतप्त आयुक्त अजय मेहता यांनी आपल्या अधिकाºयांना सर्व प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावरून
मागे घेण्याचे आदेश दिले होते.
मात्र त्यानंतर महापौर बंगल्यावर तातडीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
स्वत: मध्यस्थी करीत आयुक्तांची मनधरणी केल्याचे समजते. त्यामुळे त्यानंतरच्या स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांनी कोणतेही प्रस्ताव मागे घेतले नाहीत. परंतु या विभागांची कामे प्रलंबित राहणार असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा हे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मांडण्याची शक्यता आहे.
>असा आहे डम्पिंगच्या विषयाचा वाद
के पश्चिम, एच पूर्व व एच पश्चिम या विभागातील कचरा उचलून डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे प्रशासनाने मांडला होता. मात्र गेल्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेत जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर जून २०१८ पर्यंत त्यांना मुदतवाढ दिल्याचे निदर्शनास आणले. या दोन्ही कंत्राटासाठी निविदा काढण्यात उशीर का झाला, असा सवाल करीत प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची सूचना केली. त्यानुसार प्रस्ताव रेकॉर्ड झाला, मात्र प्रशासनाला बोेलण्याची संंधी देण्यात आली नव्हती. एच-पूर्व व एच-पश्चिम विभागात एम.ई. राज या ठेकेदाराची नेमणूक होणार आहे. या कंत्राटाची किंमत १६६ कोटी आहे.
के-पश्चिम विभागात रेफ्युज केअर या ठेकेदाराची नियुक्ती होणार आहे. कंत्राटाचे मूल्य ९४ कोटी इतके आहे.