डोळे येण्याची साथ वाढणार? मुंबईत हवेतील आर्द्रतेत वाढ, संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 04:23 PM2023-07-30T16:23:35+5:302023-07-30T16:23:55+5:30

शहरामध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये (कंजेक्टीव्हायटीस) अद्याप कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही.

Will the eyes increase Increase in air humidity in Mumbai, appeal to take precautions to prevent infection | डोळे येण्याची साथ वाढणार? मुंबईत हवेतील आर्द्रतेत वाढ, संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन

डोळे येण्याची साथ वाढणार? मुंबईत हवेतील आर्द्रतेत वाढ, संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन

googlenewsNext


मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर  मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी दवाखान्यांना सतर्क केले आहे.  ज्यांना हा संसर्ग झाला असेल, त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

शहरामध्ये डोळे येण्याच्या संसर्गामध्ये (कंजेक्टीव्हायटीस) अद्याप कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. मात्र, सध्या मुंबईत पाऊस सुरू असल्याने हवेतील आर्द्रता वाढून डोळे येण्याची विषाणूजन्य साथ  पसरू शकते. ही साथ ‘अत्यंत सांसर्गिक’ आहे आणि तिचा प्रसार रोखण्यासाठी डोळ्यांची योग्य निगा राखणे आवश्यक आहे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

संसर्ग झाल्याची लक्षणे -
डोळ्यांचा विषाणू संसर्ग हा मुख्यत्वे ॲडिनो व्हायरसमुळे होतो. याच्या लक्षणांमध्ये डोळ्यांना खाज सुटणे, डोळे लाल होणे.
पापण्या सुजणे आणि संसर्ग झालेल्या डोळ्यांतून पांढरा स्त्राव येणे यांचा समावेश होतो. 
डोळ्यांचा विषाणूजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला तरीदेखील याबाबत नागरिकांनी आवश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. 

हे करा, हे करू नका... -
-    ज्या विभागात पावसामुळे माशा किंवा चिलटांचा प्रादुर्भाव असेल तर तो परिसर स्वच्छ ठेवावा.
-    ज्या व्यक्तींमध्ये कंजेक्टीव्हायटीस आजाराची लक्षणे आढळतात, त्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे तसेच डोळ्याला वारंवार हात लावू नये. तसेच नियमित हात धुणे आवश्यक आहे.
-    एकापासून दुसऱ्या व्यक्तीला हा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
-    संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे, टॉवेल आणि चादरी स्वतंत्र ठेवाव्यात. जेणेकरून रोगाचा प्रसार कुटुंबातील इतर सदस्यांना होणार नाही.
-    शाळा, वसतिगृह, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ असेल तर डोळे आलेल्या मुलाला/मुलीला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कंजेक्टीव्हायटीसची लक्षणे आढळल्यास त्यांना शाळेत पाठवू नये.

Web Title: Will the eyes increase Increase in air humidity in Mumbai, appeal to take precautions to prevent infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.