मुंबई : खार ते गोरेगाव यादरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका उभारण्यासाठी नुकताच ब्लॉक घेण्यात आला. रविवारी रात्री उशिरा हे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात माहिम ते खारदरम्यानचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत लोकल फेऱ्या वाढवणे अशक्य असल्याचे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई सेंट्रल ते बोरिवली दरम्यान सहावी मार्गिका तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मेल एक्सप्रेस आणि लोकल यांना वेगवेगळी मार्गिका उपलब्ध होंणार आहे. एमयूटीपी २ ब अंतर्गत हे काम केले जात असून त्याला ९१८ कोटींचा खर्च येणार आहे.
सहाव्या मार्गिकेमुळे वांद्रे टर्मिनसवरून धावणाऱ्या गाड्यांसाठी दोन कॉरिडॉर उपलब्ध होतील. या मार्गावर मेल एक्स्प्रेससाठी समर्पित कॉरिडॉर असल्यास लोकल सेवा वाढण्यास मदत होणार आहे. लांबपल्ल्याच्या गाड्यांमुळे अनेकदा लोकल लेटमार्क लागतो. या मार्गिकेमुळे लोकल सेवांच्या व्यक्तीशीरपणात सुधारणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुंबई विभागीय व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले.
मुंबई सेंट्रल ते बोरिवली ६ व्या मार्गिकेचे टप्पे पहिला टप्पा - खार ते गोरेगाव अंतर ९ किमी काम - पूर्ण दुसरा टप्पा गोरेगाव ते बोरिवलीअंतर - ११ किमी काम २०२५ पर्यंत पूर्ण होणारतिसरा टप्प्पा मुंबई सेंट्रल ते खार अंतर १० किमी अद्याप कामाला सुरुवात नाही