चालू आठवड्यातही शेअर बाजारात होणार चढ-उतार?; बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 07:37 AM2022-03-14T07:37:31+5:302022-03-14T07:37:36+5:30

औद्योगिक उत्पादन तसेच पीएफच्या व्याज कपातीवरील बाजाराची प्रतिक्रिया सोमवारी दिसेल.  

Will the stock market fluctuate in the current week ?; Withdrawals from the market increased | चालू आठवड्यातही शेअर बाजारात होणार चढ-उतार?; बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले

चालू आठवड्यातही शेअर बाजारात होणार चढ-उतार?; बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले

Next

-प्रसाद गो. जोशी

युक्रेन युद्धाची अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या किमती या बाजाराला खाली खेचत असल्या तरी काही अन्य कारणांनी बाजार वाढत आहे. आगामी सप्ताहामध्येही बाजार अस्थिर राहण्याची चिन्हे आहेत. भारतामधील चलनवाढीचा दर आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदराबाबतची घोषणा याकडे बाजाराचे लक्ष लागून आहे.

औद्योगिक उत्पादन तसेच पीएफच्या व्याज कपातीवरील बाजाराची प्रतिक्रिया सोमवारी दिसेल.  मंगळवारी भारताच्या चलनवाढीबाबतची आकडेवारी जाहीर होणार आहे. तसेच १६ रोजी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह समितीच्या बैठकीत निर्णयांची घोषणा होणार आहे. त्यामधील व्याजदराबाबतचा निर्णय बाजाराला दिशा देणारा ठरणार आहे. 

बाजारातून पैसे काढण्याचे प्रमाण वाढले

मार्च महिन्यामध्ये आतापर्यंत परकीय वित्तसंस्थांनी भारतीय भांडवल बाजारातून ४५,६०८ कोटी रुपये काढून घेतले आहे. सलग सहाव्या महिन्यात या संस्था विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.

या आठवड्यात काय?

  • अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान या जगातील महत्त्वाच्या देशांतील मध्यवर्ती बँकांकडून व्याजदराबाबतची घोषणा
  • चीनमधील औद्योगिक  उत्पादन आकडेवारी
  • फेब्रुवारी महिन्यातील  महागाईची आकडेवारी
  • आयात-निर्यात आकडेवारी

Web Title: Will the stock market fluctuate in the current week ?; Withdrawals from the market increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.