कचऱ्यापासून वीज हाेणार तरी कधी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 07:34 AM2022-03-10T07:34:07+5:302022-03-10T07:34:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न सर्वच महापालिकांच्या स्तरावर सुरू आहेत. त्यात खतनिर्मिती आणि गॅसनिर्मिती ...

Will there ever be electricity from waste? | कचऱ्यापासून वीज हाेणार तरी कधी? 

कचऱ्यापासून वीज हाेणार तरी कधी? 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे हरतऱ्हेचे प्रयत्न सर्वच महापालिकांच्या स्तरावर सुरू आहेत. त्यात खतनिर्मिती आणि गॅसनिर्मिती यांच्यावर भर असून वीजनिर्मिती करण्याचा प्रयत्न मात्र शंभर टक्के यशस्वी झाला नाही. मुंबई व ठाण्यात त्यासाठी वेगळे प्रयत्न सुरू असले तरी घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई अव्वल ठरली आहे.

कांजूरमार्ग येथे कचऱ्यातून गॅस निर्मिती होते. बायोरिऍक्टर तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्यावर प्रक्रिया करणारा देशातील पहिला प्रकल्प आहे. प्रकल्पामुळे जवळपासच्या परिसरात दुर्गंधी पसरण्यावर नियंत्रण मिळते. देवनार येथील ४ मेगावॉटच्या प्रकल्प सध्यातरी कागदावरच आहे. मुंबई महापालिकेने खतनिर्मितीसाठी वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात प्रकल्प सुरू केला. तर, नव्या इमारतींना सांडपाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा पुनर्वापर, तसेच ओल्या कचऱ्याचे विघटन करून त्यापासून खताची निर्मिती करणे बंधनकारक केले आहे. यानुसार करी रोड येथील विघ्नहर्ता व शिवडी परिसरातील टोकेरशी जिवराज मार्गावरील अशोका गार्डन या इमारती महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवत आहेत.

ठाण्यातही खत आणि मिथेन गॅस
ठाणे महापालिकेला ४०० मेट्रिक टन कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि १०० मेट्रिक टन कचऱ्यापासून मिथेन गॅसची निर्मिती करण्यात यश आले आहे.  खतनिर्मितीचे प्रकल्प हे घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट, ऋतू पार्क व कौसा येथे सुरू आहेत. तर, हिरानंदानी इस्टेट आणि कळवा हॉस्पिटल या भागात पालिकेकडून १०० मेट्रिक टन कचऱ्यापासून मिथेन गॅसची निर्मिती केली जाते.
कल्याण : महापालिकेने कचऱ्यापासून खत तयार करण्याचे उंबर्डे व बारावे येथे प्रकल्प उभारले. तर ओल्या कचऱ्यापासून बायाेगॅस तयार करण्याचे प्रकल्प पाच ठिकाणी सुरू आहेत. 
नवी मुंबई : महापालिका कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती करते. प्रतिदिन ३५ ते ४० टन खतनिर्मिती केली जाते. प्लॅस्टिक व सुक्या कचऱ्यावरही प्रक्रिया केली जाते. ‘भू-निदान’ या नावाने हे खत विविध ठिकाणी विकले जात आहे. 

Web Title: Will there ever be electricity from waste?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.