शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर, रऊफचे फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 04:06 PM2022-09-10T16:06:32+5:302022-09-10T16:07:34+5:30

याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत किशोरी पेडणेकर यांची बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली

Will they also be investigated? Shiv Sena's response to BJP on Yakub Menon controversy | शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर, रऊफचे फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल

शिवसेनेचं भाजपला जशास तसं उत्तर, रऊफचे फडणवीसांसोबतचे फोटो व्हायरल

Next

मुंबई - राजधानी मुंबईतील १९९३ च्या बॉम्ब हल्ल्यातील कुख्यात याकूब मेननच्या कबरीवरील लायटींग आणि सवाजटीवरुन शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकारात असलेल्या कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आलेल्या याकूब मेननच्या कबरीवरील सजावटावरुन आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. याप्रकरणी भाजपने शिवसेना आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना लक्ष्य केले. त्यानंतर, आता पडणेकरांनीही भाजप नेत्यांसोबतचे याकूब मेननच्या नातेवाईकांचे फोटो शेअर केले आहेत.  

याकूब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत किशोरी पेडणेकर यांची बैठक झाली असल्याचा आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. पेडणेकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबतचे रऊफ मेमनचे फोटो दाखवून भाजपला जशास तसं प्रत्युत्तर दिलंय. आता फडणवीस आणि कोश्यारी यांच्या चौकशीचीही मागणी करणार का? असा प्रश्न त्यांनी भाजप नेत्यांना विचारलाय.

याकूब मेमनच्या कबरीच्या सजावटीवरुन वाद रंगला असतानाच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी याकुब मेमनचा नातेवाईक रऊफ मेमनसोबत एक बैठक घेतली असल्याचा आरोप करत संबंधित बैठकीचा व्हिडीओ भाजपने जारी केला. ज्या याकुब मेमनने १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात शेकडो जणांना रक्तबंबाळ केलं, त्याच्या नातेवाईकासोबत किशोरी पेडणेकर बैठक कशा घेऊ शकतात? असा सवाल करत मविआ नेत्यांचे आणि मेमनच्या कुटुंबियांच्या संबंधांची पोलिसांमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही भाजपने केली. त्यानंतर किशोरी पेडणेकरांनी आक्रमक पवित्रा घेत भाजप नेत्यांसमेवतचे रऊफचे फोटो शेअर केले आहेत. 

"बडा कब्रस्तानच्या समोर पाणी भरलं असल्याने मी तिथे गेले होते. मी बडा कब्रस्तानमध्ये गेले असल्याचं नाकारलंच नाही. पण मी महापौर असताना माझ्या नेत्याने सांगितल्याने तिथे गेले होते. बैठकीला कोण कोण होते, याची मला कल्पना नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय स्त्रींवर आरोप करुन भाजपला काय मिळतं. आम्हाला सातत्याने टार्गेट करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. आमचा गुन्हेगारांशी संबंध असण्याचा प्रश्नच नाही. मात्र, वारंवार कुठल्या ना कुठल्या प्रकरणावरुन आमच्यालर आरोप करुन आमचं संयमी नेतृत्व कसं भडकेल, याची वाट भाजप पाहत आहे. 

म्हणून मी बैठकीला गेले

माझ्या नेत्याने मला तेथील पाहणी करण्यास सांगितलं. मग बैठकीत कोण कोण उपस्थित आहे, याची मी काय माहिती घेत बसू का? तिथे बैठकीला कोण कोण होतं, याची मला माहिती नाही. पण वडाला पिंपळाची साल लावण्याचा हा प्रकार आहे", असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी भाजपने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

व्हिडिओत पेडणकेरांसोबत रऊफ 

किशोरी पेडणेकर या महापौर असताना रऊफ मेमनसोबत बडा कब्रस्तानमध्ये बैठक झाल्याचा आरोप भाजपने व्हिडिओ शेअर करत केला आहे. या बैठकीत पेडणेकरांसोबत जवळपास २० ते २५ लोक बैठकीला उपस्थित असल्याचं व्हिडीओतून दिसून येतंय. रऊफने तोंडाला मास्क लावलाय. पेडणेकर आणि रऊफ यांच्यात काहीतरी गंभीर विषयांवर चर्चा सुरु असल्याचं दिसून येतंय. तर, महापालिकेचे अधिकारीही येथे उपस्थित असल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. 
 

Web Title: Will they also be investigated? Shiv Sena's response to BJP on Yakub Menon controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.