उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:05 PM2024-06-06T18:05:56+5:302024-06-06T18:06:57+5:30

Jayant Patil : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा 'एनडीए'च्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान,या चर्चांवर आमदार जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Will Uddhav Thackeray go to NDA again? Jayant Patil was told clearly | उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Jayant Patil ( Marathi News ) : ४ जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले. एनडीए'ला बहुमत मिळाले असून सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एनडीए'मध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसापूर्वी नरेंद्र मोदी यांनीही याबाबतीत भाष्य केले होते. उद्धव ठाकरेंसाठी एक खिडकी उघडी ठेवल्याचे मोदी म्हणाले होते, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आता या चर्चांवर 'राष्ट्रवादी शरदचंद्र पवार' पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

"उद्धव ठाकरे भाजपप्रणित एनडीएमध्ये जाणार नाहीत, असं जयंत पाटील म्हणाले. काल शिवसेना ठाकरे गटाकडून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी खासदार संजय राऊत उपस्थित होते. दरम्यान, आज मुंबईत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी खासदार मुंबईत आले होते. यावेळी जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यामुळे आमचा ८० टक्के स्ट्राईक रेट राहिला. आम्ही दोन जागा अधिक लढवल्या असत्या तर अधिक जागा मिळाल्या असत्या. आगामी विधानसभा निवडणुकीत १८० पेक्षा अधिक आमदार आमचे निवडून येतील अशी आमची अपेक्षा आहे.

"देवेंद्र फडणवीस यांनी उद्विग्न होऊन असे उद्गार का काढले हे माहिती नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. दिल्लीत बसलेले लोक त्यांचे भविष्य ठरवू शकतात. महाराष्ट्रातली परिस्थिती, दोन पक्ष फोडल्यामुळे, सोबतच महागाई, बेकारी, जीएसटी यामुळे जनता त्रस्त झाली होती. महाराष्ट्रातील कहाणी याच्याही पुढे आहे. राज्याच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या मनाला लागल्या आहेत. लोकसभेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णपणे काम केले. मात्र आता तो त्यांचा तो निर्णय आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
  
रवी राणांनी केला गौप्यस्फोट

एक्झ्टिट पोलचे आकडे आल्यानंतर आमदार रवी राणा यांनी मोठा गौप्यस्फोट केला. रवी राणा म्हणाले, उद्धव ठाकरे निकालानंतर २० दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत दिसतील, असा दावा राणा यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Web Title: Will Uddhav Thackeray go to NDA again? Jayant Patil was told clearly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.