मुंबई :
नगरविकास खाते आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे होते; पण त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य होते का? असा सवाल करून भाजपचे नितेश राणे यांनी या विभागाचा आढावा, बैठकी आधीचे पर्यटन मंत्री आणि वरुण सरदेसाई घेत होते, असा आरोप केला. नगरविकासच्या फायली मातोश्रीवर जायच्या, वैभव चेंबरमध्ये जायच्या, असे ते म्हणाले.
राणे यांच्या आरोपांवर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना आमदार संतप्त झाले. रवींद्र वायकर यांनी सदस्यांना नोटीस न देता कोणाचे नाव सभागृहात घेता येत नाही, असे सांगितले. मात्र, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तो फेटाळला. जी नावे राणे घेत आहेत ते सभागृहाचे सदस्य नाहीत, त्यामुळे नाव घेता येते,