ब्रिटनमधून आलेल्या १५८३ प्रवाशांना घरी जाऊन तपासणार; महापालिकेचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 07:39 PM2020-12-25T19:39:29+5:302020-12-25T19:40:59+5:30

Corona Virus News: २५ नोव्हेंबरनंतर आलेल्या प्रवाशांच्या घरी पोहोचणार पालिकेचे पथक. ब्रिटनमधून मुंबई विमानतळावर सोमवारपासून आतापर्यंत १६८८ प्रवाशी आले होते.

will Visit homes of 1583 passengers from Britain in BMC | ब्रिटनमधून आलेल्या १५८३ प्रवाशांना घरी जाऊन तपासणार; महापालिकेचे आदेश

ब्रिटनमधून आलेल्या १५८३ प्रवाशांना घरी जाऊन तपासणार; महापालिकेचे आदेश

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यामुळे सोमवारपासून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र महिनाभराच्या कालावधीत मुंबईत आलेल्या अशा परदेशी प्रवाशांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे २५ नोव्हेंबरनंतर मुंबईत आलेल्या १५८३ प्रवाशांच्या घरी जाऊन पालिकेचे वैद्यकीय तपासणी करणार आहेत.

ब्रिटनमधून मुंबई विमानतळावर सोमवारपासून आतापर्यंत १६८८ प्रवाशी आले होते. यापैकी मुंबईतील हॉटेलमध्ये ७५४ प्रवाशी क्वारंटाइन आहेत. तर २५ नोव्हेंबर २०२० पासून, म्हणजे एक महिन्याच्या कालावधीत मुंबईत आलेल्या लोकांनी त्यांच्यात कोरोनाविषयक लक्षणे आढळल्यास त्वरित वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेने केले होते. मात्र आता कोणताही धोका न पत्करता अशा प्रवाशांच्या घरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

विमानतळ प्राधिकरणाकडून अशा १५८३ प्रवाशांच्या नावांची यादी, त्यांच्या घरचा पत्ता व संपर्क क्रमांक पालिकेने प्राप्त केले आहेत. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक त्या त्या विभागातील प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहे. या पथकामध्ये दहा अधिकारी - कर्मचारी असणार आहेत. प्रत्येक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची बैठक बोलावून नियोजन करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.


पालिकेच्या २४ प्रशासकीय विभाग कार्यालयातील वैद्यकीय पथक २५ नोव्हेंबर २०२० नंतर ब्रिटनमधून आलेल्या १५८३ प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करणार आहे. यापैकी एखादा व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांची चाचणी व आवश्यकतेनुसार त्यांना उपचार देण्यात येतील.

- सुरेश काकाणी (अतिरिक्त पालिका आयुक्त)

 

ब्रिटनहून आलेल्या नागरिकांना पालिकेची सूचना...

* फॅमिली डॉक्टर, पालिका दवाखाना, आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी. 

*  कोविड चाचणी करुन घ्यावी. मास्कचा वापर, हातांची नियमित स्वच्छता, सुरक्षित अंतर राखावे.

* ताप, कफ, श्वास घेण्यास त्रास होणे अथवा अन्य आजारांचे कोणतेही लक्षण असल्यास ‘वॉर्ड वॉर रुम’कडे संपर्क साधावा. 

Web Title: will Visit homes of 1583 passengers from Britain in BMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.