मुंबई : मुंबईतील सर्व बसमार्ग तोट्यात असल्याने बेस्ट उपक्रमाने बसफे- या कमी केल्या. याचा फटका रिक्षा-टॅक्सीचा प्रवास न परवडणा-या सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी बेस्ट प्रशासनाने खासगीकरणाचा मार्ग अवलंबिला आहे. त्यानुसार भाडेतत्त्वावर घेतलेल्या ४५० बसगाड्या लवकरच मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहेत. मात्र, या नवीन बसगाड्यांमुळेबसथांब्यांवरील प्रवाशांची प्रतीक्षा संपणार का, याविषयी मुंबईकरांमध्ये उत्सुकता आहे.रेल्वेनंतर मुंबईची दुसरी लाइफलाइन असलेल्या बेस्टच्या बसगाड्यांमधून एकेकाळी रोज ४२ लाख प्रवासी प्रवास करीत होते. मात्र,आर्थिक संकट वाढत गेल्यानंतर बेस्टच्या बसगाड्यांची स्थिती खराब झाली. एखादे चढण चढताना किंवा उतरताना बसगाड्या बंद पडू लागल्या.वर्दळीच्या वेळेत भर रस्त्यात बसगाड्या बंद पडल्यावर प्रवाशांचे हाल तसेच वाहतुकीतही अडथळा निर्माण होत होता. यामुळे प्रवासी मेटाकुटीस आले. कालांतराने नादुरुस्त बसगाड्यांची संख्या वाढली. बस आगारांमध्ये बंद बसगाड्यांचा आकडा वाढत गेला, याचा परिणाम बसफेºयांवर होऊन प्रवाशांची बसथांब्यांवरील प्रतीक्षा वाढली.मुंबईतील एकूण ५०२ मार्गांवर बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्या चालविल्या जातात. मात्र, एकही मार्ग नμयात नसल्याने काटकसरीसाठीबरेच बसमार्ग बेस्ट प्रशासनाने बंद केले. याचा उलट फायदा शेअर रिक्षा व टॅक्सीला झाला असून त्यांचे धंदे तेजीत आहेत. शेअर रिक्षा-टॅक्सीबरोबरच मेट्रो व मोनो रेल्वेने बेस्टचा प्रवासीवर्ग पळविला. तरी आजघडीला बेस्टच्या बसगाड्यांमधून २९ लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांना आजही बसथांब्यावर बससाठी तिष्ठत राहावे लागत आहे. उन्हातान्हात मुंबईकरांना दिलासा देणारी वातानुकूलित बसही बंद केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढली आहे. स्वतंत्र बस मार्गिका मुंबईकरांचा प्रवास सुकर करेल, अशी आशा होती.वाहतुकीच्या मार्गातून स्वतंत्र वाट मिळाली असता बेस्ट बसगाड्या आणि प्रवाशांचा प्रवासही सुसाट झाला असता. मात्र, या प्रस्तावाबाबतअनास्थाच दिसून येत असल्याने मुंबईकरांना वाहतुकीच्या कोंडीतून आणि धक्के खात प्रवास करावा लागत आहे. त्यात रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कधी-कधी त्रास वाढवत असते. ‘भाड्याने घेतलेल्या बसगाड्यांची देखभाल संबंधित खासगी कंपनीच करणार आहे. त्यामुळे वाहने ‘फिट’ राहून बसफे-यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता असल्याने मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्थादिव्यांग प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यासाठीही याबसगाड्यांमध्ये विशेष काळजी घेतली जाणार आहे. याबसगाड्यांमध्ये व्हीलचेअरसाठी विशेष जागा ठेवण्यातयेणार आहे.ठेकेदारांमार्फत बेस्ट प्रशासन एकूण ४५० बसगाड्याघेणार आहे. यामध्ये २०० वातानुकूलित मिनीबसगाड्या, २०० मिनी विनावातानुकूलित व ५० मिडीविनावातानुकूलित बसगाड्यांचा समावेश आहे. या मिनीआणि मिडी बसगाड्या वाहतुकीतून सहज मार्ग काढूशकतील. त्यामुळे बेस्टच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.बेस्ट उपक्रमाच्याताμयात सध्या ३हजार ३३७ बसगाड्याआहेत. यामध्ये जुलै२०१८ पर्यंतबसगाड्यांची संख्या ३हजार ७८७ वरपोहोचेल.पुढच्या टप्प्यात ८००बसगाड्या भाड्याने घेतल्याजाणार आहेत.३१ आसनीअसलेल्या मिडी बसमध्ये १२प्रवासी उभे राहू शकतात. मिनीबसगाड्यांमध्ये २१ आसनक्षमताअसून नऊ प्रवासी उभे राहूशकतात.८.१८ची महिला लोकल पुन्हा सुरू करापश्चिम रेल्वेवर सध्या ९.३८ मिनिटांची वसई-चर्चगेट ही महिला विशेषलोकल धावते. ही लोकल ११ किंवा ११.१५च्या सुमारास चर्चगेटस्थानकावर पोहोचते. या लोकलमुळे वेळेत कार्यालयातपोहोचणे शक्य होत नाही. विशेष म्हणजे सकाळी ८ वाजून१८ मिनिटांनी वसई येथून सुटणारी महिला विशेष लोकल रद्दकरून ही लोकल सुरू करण्यात आली होती. यामुळे ८.१८मिनिटांची महिला विशेष लोकल पुन्हा सुरू करण्यात यावी.लोकल फेºया वाढविणे शक्य नसल्यास गर्दीच्या वेळी किमानमहिला राखीव बोगींची संख्या वाढवावी. महिला नोकरदारवर्गाची संख्या ३० ते ४० टक्के आहे. ‘महिला दिना’चे केवळदेखावे साजरे न करता प्रत्यक्षात लोकल फेºयांमध्ये वाढ करण्याची गरज आहे.- श्रद्धा मोरे, महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी संघ, पश्चिम रेल्वे
‘बेस्ट’च्या प्रवाशांची प्रतीक्षा संपणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 7:09 AM