ताशी ८० किमी वेगाने वाहिले वारे, आजही अतिवृष्टीचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:07 AM2020-08-06T01:07:22+5:302020-08-06T01:07:51+5:30

बुधवारी सकाळी मुंबईत बऱ्यापैकी पाऊस बरसत होता. दुपारी मात्र पावसाने उघडीप घेतली. मात्र दुपारी ३ वाजता मुंबईत वेगाने वारे वाहू लागले.

Winds blowing at a speed of 80 km per hour, heavy rain forecast even today | ताशी ८० किमी वेगाने वाहिले वारे, आजही अतिवृष्टीचा अंदाज

ताशी ८० किमी वेगाने वाहिले वारे, आजही अतिवृष्टीचा अंदाज

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारीही पावसाने धुवांधार बॅटिंग केली. विशेषत: दुपारी ३ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता मुंबईत ताशी ६० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहिले. मुंबईत विशेषत: दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळली. तर गुरुवारीदेखील मुंबईत
तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

बुधवारी सकाळी मुंबईत बऱ्यापैकी पाऊस बरसत होता. दुपारी मात्र पावसाने उघडीप घेतली. मात्र दुपारी ३ वाजता मुंबईत वेगाने वारे वाहू लागले. ताशी ५० ते ६० किमी वेगाने वाहणारे वारे, जोरदार मारा करणाºया जलधारांनी मुंबईकरांना झोडपून काढले. वाºयाच्या वेगाने दाखल झालेल्या पावसाने तब्बल रात्री ७ वाजेपर्यंत मुंबईला पावसाने तुफान झोडपून काढले. या काळात मुंबईत सर्वत्र ताशी ९० किमी वेगाने वारे वाहिले. त्यामुळे विशेषत: दक्षिण मुंबई परिसरात झाडे मुळासकट उन्मळून कोसळल्याची घटना घडल्या. पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था अतिवृष्टीमुळे लोकल सेवा व रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर किंवा अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्टेशन नजीकच्या मनपा शाळांमध्ये करण्यात आली, अशी माहिती महापलिकेने दिली.

Web Title: Winds blowing at a speed of 80 km per hour, heavy rain forecast even today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.