Join us

प्रभाग सरकले...इच्छुकांमध्ये रस्सीखेच

By admin | Published: October 25, 2016 4:25 AM

फेररचनेमुळे शहराला मोठा धक्का बसला. यात बी आणि सी प्रभागच हलला आहे. ए वॉर्डमधील दोन प्रभाग बी वॉर्डमध्ये सरकले असून सी मध्येही हीच अवस्था आहे. शहरातून

मुंबई : फेररचनेमुळे शहराला मोठा धक्का बसला. यात बी आणि सी प्रभागच हलला आहे. ए वॉर्डमधील दोन प्रभाग बी वॉर्डमध्ये सरकले असून सी मध्येही हीच अवस्था आहे. शहरातून एक सात प्रभाग गायब झाले आहेत. याचा धक्का ए, बी आणि सी वॉर्डला समान बसला आहे. यामुळे या प्रभागांमध्ये इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. मेट्रोच्या मुद्दावर आक्रमक राहिल्याने येथील मराठीबहुल भागातून शिवसेनेला फायदा मिळू शकेल. मात्र इच्छुक अधिक असल्याने बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.शहर भागामधील लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात उपनगरामध्ये स्थलांतरीत झाली आहे. यामुळे बी वॉर्डमध्ये ५४ हजार आणि सी वॉर्डमध्ये ५७ हजार लोकसंख्या उरली आहे. लोकसंख्येत घट झाल्यामुळे बी आणि सी वॉर्डमधून प्रत्येकी एक प्रभाग कमी करण्यात आला आहे. त्यामुळे बी वॉर्डमध्ये आता दोनच नगरसेवक उरले आहेत. तर सी वॉर्डमध्ये तीन प्रभाग उरले आहेत. फेररचनेमुळे प्रभागांच्या सीमाही सरकल्यामुळे येथील नगरसेवकांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आपली राजकीय कारकीर्द वाचविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांना येथे पायपीट करावी लागणार आहे.बी वॉर्डमध्ये काँग्रेसचे ज्ञानराज निकम आणि वकारुन्नीसा अन्सारी यांचे प्रभाग सी वॉर्डमध्ये सरकले आहेत. तर शिवसेनेचे गणेश सानप आणि काँगे्रसचे जावेद जुनेजा यांच्या प्रभागाचा काही भाग बी वॉर्डमध्ये आला आहे. तर सी वॉर्डमध्ये एक प्रभाग उडाला आहे. बेकायदा बांधकामं व फेरिवाल्यांचा विळखा असलेल्या बी वॉर्डमध्ये नागरी सुविधांचाही अभाव आहे. मात्र या वॉर्डमध्ये काँग्रेसचे वर्चस्व असल्याने शिवसेनेला या ठिकाणी तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे. वॉर्ड बी प्रभाग क्रमांक : २२३खुला (महिला)लोकसंख्या : ३०४५अनुसूचित जाती : ४७८०अनुसूचित जमाती : ७५९उमरखाडी, दानाबंदर, प्रिन्सेस डॉक, वाडीबंदरप्रभाग क्रमांक : २२४इतर मागासवर्ग (महिला)लोकसंख्या : ६४२४५अनुसूचित जाती : ५५८अनुसूचित जमाती : ३३० व्हिक्टोरिया डाक्स, बेंगालीपूरा, कोळीवाडा, मांडवी, पायधूनीवॉर्ड सी प्रभाग क्रमांक : २२०खुलालोकसंख्या : ५४४१८अनुसूचित जाती : ८५९अनुसूचित जमाती : ९३कामाठीपुरा, नळबाजार, गुलालवाडी प्रभाग क्रमांक : २२१खुलालोकसंख्या : ५७१४१अनुसूचित जाती : २५०अनुसूचित जमाती : ८७विठ्ठलवाडी, झवेरी बाजार, फणसवाडी, भुलेश्वर, लोहार चाळ, प्रभाग क्रमांक : २२२इतर मागासवर्ग (महिला)लोकसंख्या : ५४६०२अनुसूचित जाती : ११९९अनुसूचित जमाती : १९८धोबी तलाव, सोनापूर, चंदनवाडी, जिमखाना, ठाकूरद्वार, चेऊलवाडी महापालिका २०१२ च्या निवडणुकीतील विजयी उमेदवार प्रभाग २१७विजयी उमेदवार : युगंधरा साळेकर - ५९६४पराभूत उमेदवार : प्रीती कुडाळे - ४८०९ प्रभाग २१८ विजयी उमेदवार : संपत ठाकूर - ६७०१ पराभूत उमेदवार : राकेश काळे - ३४९०प्रभाग २१९ विजयी उमेदवार : वीणा जैन पराभवी उमेदवार : स्वीटी संघवी प्रभाग २२० विजयी उमेदवार : याकूब मेमन - ६४७५पराभूत उमेदवार : नदीन सलीम चोहान - ६३३३प्रभाग २२१विजयी उमेदवार : ज्ञानेश्वर निकम - ७४८९पराभूत उमेदवार : अमित साखरकर - ५३७६प्रभाग २२२विजयी उमेदवार : वकारउनीसा अन्सारी : ५१६६पराभूत उमेदवार : सईदा मर्चंट : २६००प्रभाग २२३विजयी उमेदवार : जावेद जुनेजा - ४८८४पराभूत उमेदवार : शोभन परवीन - ३२७२ प्रभाग २२४विजयी उमेदवार : गणेश सानप - ५८७०पराभूत उमेदवार : शिवकुमार साहू - ४३९९