स्वप्नांना पंख नवे
By admin | Published: November 24, 2014 11:04 PM2014-11-24T23:04:40+5:302014-11-24T23:04:40+5:30
स्वप्नांना भरभक्कम पंखांचे बळ देऊन उंच भरारी घेऊन स्वत:ला सिध्द करणो ही संकल्पना केंद्रभागी ठेवून स्टार प्रवाह आणि लोकमत सखी मंच ने ‘स्वप्नांना पंख नवे’ या भव्य गौरव सोहळ्य़ाचे आयोजन केले होते.
Next
स्टार प्रवाह प्रस्तुत लोकमत सखीमंचचे आयोजन
मराठी वाहिनीवर रंगवल्या
गेलेल्या कर्तबगार स्त्री व्यक्तीरेखा यांचा एक धागा समाजात कतृत्त्ववान महिलांच्या आयुष्याशी जोडलेला असून स्वप्न बघणो आणि त्या स्वप्नांना भरभक्कम पंखांचे बळ देऊन उंच भरारी घेऊन स्वत:ला सिध्द करणो ही संकल्पना केंद्रभागी ठेवून स्टार प्रवाह आणि लोकमत सखी मंच ने ‘स्वप्नांना पंख नवे’ या भव्य गौरव सोहळ्य़ाचे आयोजन केले होते.
ठाणो : ‘स्वप्नांना पंख नवे’ हा कार्यक्रम 22 नोव्हेंबरला ठाण्यातील टीपटॉप प्लाझा येथे पार पाडला. स्टार प्रवाह वाहिनीवरील कर्तृत्त्ववान स्त्री व्यक्तीरेखा दुर्वा मालिकेतील दुर्वा (ऋता दुगरुळे), लगोरी मालिकेतील ऋजुता (दिप्ती लेले), उर्मिला( अनुजा साठे- गोखले)े, जयोस्तुते मालिकेतील प्रगती राजवाडे (प्रिया मराठे) या उपस्थित होत्या. या पडद्यावरील व्यक्तीरेखा आणि ख:या आयुष्यात ज्यांनी आपला वेगळा ठसा समाजात उमटविला अशा वीणा पाटील (वीणा वल्र्ड), रश्मी करंदीकर (डी.सी.पी. वाहतूक शाखा), उज्ज्वला हावरे (हावरे ग्रुप), संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), खूशबू शेठ (इव्हेंट अॅण्ड अॅड) या रिअल नायिका ही उपस्थित होत्या. त्यांच्याशी संवाद सुसंवादिनी उत्तरा मोने यांनी साधला. आपले लक्ष्य सुनिश्चित केले आणि यशाच्या दिशेने अथक वाटचाल केली तर यश मिळतेच या सगळ्य़ा मध्ये ‘स्त्री’ ला घरच्यांची साथ असणो खूपच गरजेचे असते. असा एक उपयुक्त संदेश ही या कार्यक्रमांतर्गत दिला गेला.
यशस्वींनाचा सत्कार सन्मान पत्र आणि मानचिन्ह देऊन स्टार प्रवाहचे प्रोग्रॅमिंग हेड जयेश पाटील दै. लोकमत मुंबईचे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुकला, टिपटॉप प्लाझाचे सव्रेसर्वा रोहित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. मिसेस नायक्स मसालेच्या सुशिला नायक तर सेलिब्रेटीचा सत्कार नगरसेविका परिषा सरनाईक, नंदिनी राजन विचारे, उषा भोईर, तसेच उर्वशी शाह यांच्या हस्ते तुळशीचे रोप देऊन करण्यात आला. यावेळी नगरसेविका रूचिता मोरे, उद्योगमैत्रिणच्या सारिका भोईटे-पवार , माधवबागच्या मंगला लोखंडे, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. विजय सुरासे आणि लोकमतचे सहाय्यक उपव्यवस्थापक राघवेंद्र शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला स्टार प्रवाहचे पाटील यांनी सांगितले की, मनोरंजनातून सामाजिक बदल घडविणो हाच आमच्या वाहिनीचा मुख्य उद्देश आहे. मराठी स्त्री ही भक्कम आहे. तीच ख:या अर्थाने समाजाचा विकास घडवू शकते. हाच उद्देश डोळ्य़ासमोर ठेवून स्वप्नांना पंख नवे देणा:या समाजातील रिअल हिरोईन्स कोण आहे. त्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न लोकमत सखी मंचच्या पुढाकाराने आम्ही केला आहे. या कार्यक्रमाचे व्हेन्यू पार्टनर टिपटॉप प्लाझा हे होते. तर गिफ्टस पार्टनर मिसेस नायक्स मसाले हे होते. सर्व सखींना रेडी टु कुक पनीर माखनवाला आणि राईस खीर ची पॅकेट्स भेट देण्यात आली. रंजना फडके यांनी गणोशवंदना ,नृत्याविषकाराने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तसेच मुंबई लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी प्रास्ताविक केले.
महिला सुरक्षितता
हे ध्येय
-रश्मी करंदीकर
पोलिस फिल्डमध्ये गेले. त्याचे क्रेडिट सासरच्या मंडळीना जाते. त्यांनी मला पोलिसात जाण्यासाठी प्रेरित केले. मंत्रलयात बडया पगाराची नोकरी करण्याइतपत माङयाकडे शैक्षणिक पात्रता होती. पण एक चाक ोरीबध्द जीवन जगण्यापेक्षा भरारी घेणारे काही तरी करावे. महिलांना आव्हानात्मक आहे असे क्षेत्र निवडण्याची उर्मी मनी होती. त्याप्रमाणो मी पोलिस अधिकारी झाले. त्यासाठी मला माङया पतीची साथ लाभली. त्यातून माहेर सासरही सीमारेषा पुसली गेली. असत्याच्या बाजूने उभे राहण्याचा प्रसंग जीवनात अजूनर्पयत आलेला नाही.
‘कुछ भी कर सकते है’
- खुशबु शेठ
इव्हेंटच्या कंपनीतून नावारूपाला आलेल्या खुशबू शेठ यांच्या कंपनीचे ब्रीदवाक्यच हम चाहें तो कुछ भी कर सकते है.. दररोज येणारा दिवस हे आपल्याला वेगळे काही शिकवून जातो. दररोज भेटणारी माणसे वेगळी असतात. त्यांना सामोरे जाताना. अडचणींवर मात करताना अनुभवातून धडे मिळतात. तेच फार उपयुक्त असतात.
संकटात
संधी शोधा
-संपदा जोगळेकर
घराशी मी घट्ट जोडलेली होती. फॅमिली हा माझा पहिला चेहरा होता. त्यानंतर सेलिब्रिटी हा माझा दुसरा चेहरा झाला. त्याला कारण माङो सासर. सासरच्या सात पिढय़ात अभिनय हा प्रकार नव्हता. गालाला रंग लावून सिनेमात, नाटकात काम करायला घरातून विरोध होता. त्यांचा विश्वास प्रथम मला संपादन करावा लागला पंखात बळ असल्यावर अनेक क्षेत्रत भरारी घेता येते. नाटक थांबविले. तेव्हा मी गायन सुरू केले.
पडद्यावरील
हिरॉईन्सना
काय वाटते?
दुर्वा मालिकेतील दुर्वा (ऋता दुर्गुळे)े हिने सांगितले, आम्ही ज्या रिअल हिरॉईन्स पडद्यावर साकरतो. त्यात प्रत्यक्षात भेटल्याचा आम्हाला खूप वेगळा आनंद आहे. रिअल हिरॉईन्स या स्ट्राँग आहेत. त्यामुळे त्या जीवनात यशस्वी आहेत. जवळची माणसेच जीवनात साथ देतात. ख:या जीवनातील व्यक्ती मालिकांमध्ये साकारताना त्यांचे जीवन आम्हाला प्रथम समजून घ्यावे लागते.
लगोरी मालिकेतील ऋजुता (दीप्ती लेले)आणि उर्मिला (अनुजा साठे- गोखले म्हणाल्या की, जीवनात मैत्रीला मोठे स्थान आहे. एकमेकांची साथ असल्यावर यश गाठता येते. मैत्री हीच आमच्या जीवनातील ताकद आहे.
जयोस्तुते मालिकेमधील प्रगती राजवाडे (प्रिया मराठे) गरीबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना एक न्याय असू शकत नाही. असत्तेच्या विरोधात लढा देताना मी सत्याच्या बाजूने उभी असते. कोर्टाची पायरी चढायला घाबरू नका. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कोर्टाची पायरी चढणो आवश्यक आहे.