थंडी, शेकोटी आणि मज्जा...

By Admin | Published: January 5, 2015 10:42 PM2015-01-05T22:42:46+5:302015-01-05T22:42:46+5:30

कॉलेज लाइफमध्ये जशी तरुणाई वर्षा सहलीची मज्जा लुटते, निसर्गाच्या कुशीतून सहलीत धुंद-ओलेचिंब भिजण्याचा आनंद घेते, तोच आनंद बदलणारा प्रत्येक ऋतू देत असतो.

Winter, fire and mood ... | थंडी, शेकोटी आणि मज्जा...

थंडी, शेकोटी आणि मज्जा...

googlenewsNext

कॉलेज लाइफमध्ये जशी तरुणाई वर्षा सहलीची मज्जा लुटते, निसर्गाच्या कुशीतून सहलीत धुंद-ओलेचिंब भिजण्याचा आनंद घेते, तोच आनंद बदलणारा प्रत्येक ऋतू देत असतो. प्रत्येक सिझनचे वेगळेपण असते. त्यामुळे सिझनेबल ट्रीप अथवा ट्रेक हा अत्यंत आनंददायी व संस्मरणीय ठरतो. थंडीतील पिकनिक हीदेखील मनाला ऊब देणारी ठरते. गारेगार थंडीत गरमागरम पदार्थांवर ताव मारून शेकोटीभोवती रंगलेली गप्पांची मैफल, हॉररपासून म्युझिकपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या अन्फरगॉटेबल ठरतात. तरुणाईला थंडी, शेकोटी आणि मज्जा देणाऱ्या ‘कोल्ड अ‍ॅण्ड कूल पिकनिक’विषयी काय वाटते, ते पाहू या... -जान्हवी मोर्ये

शेकोटीची मज्जा
मनीषा कॉलेजातील एफवायबीकॉमला असलेला ओमकार भोईर याने सांगितले की, मी नुकताच लोणावळ्याला मित्रांच्या गु्रपसोबत जाऊन आलो. मला थंडी खूप आवडते. पिकनिकला जाऊन आनंद घ्यायचा असतो, तो थंडीच्या गारेगार कूल वातावरणाचा. कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटल्यावर मनाचे सगळे कप्पे खुलतात. गप्पांची दारे उघडतात. फुल्ल नाइट गप्पांचा फड रंगतो. त्यात कोणताही विषय वर्ज्य नसतो. गिटारवर गाणी म्हटली की, मनाला तजेला येतो. मंद संगीताचा स्वर आणि शेकोटीची ऊब या सगळ्या गोष्टींचा आनंद घरी घेता येत नाही. हा आनंद केवळ पिकनिकमध्ये एन्जॉय केला जातो, तो मी केला. त्यात मला खरी मज्जा आली. पिकनिकमधून आपल्याला निसर्गाविषयी आवड निर्माण होते. ऋतूंची गम्मत कळते. तसेच स्पॉट माहिती होतात. आपले भौगोलिक ज्ञान वाढते. म्हणून प्रत्येक ऋतूत एकतरी पिकनिक एन्जॉय करावी.

कॅन्टीनचा वाफाळता चहा आणि कट्ट्यावरील धम्माल
प्रगती कॉलेजमध्ये एफवायबीकॉमला शिकणारी दीपिका मिरशी हिने सांगितले की, लहान असताना कोल्ड पिकनिक एन्जॉय केल्या आहेत. त्या वेळी कुटुंबीयांसोबत, स्कूलमधून या पिकनिकचा आनंद लुटला आहे. मित्रमैत्रिणींसोबत ट्रेक अथवा कोल्ड पिकनिक केलेली नाही. आता कॉलेजमधूनही वर्षा सहलीचे आयोजन केले जात नाही. हल्लीच आम्ही मित्र-मैत्रिणी वरळी सी-फेसला थंडीत गेले होतो. तेवढाच एक थंडीच्या पिकनिकचा अनुभव माझ्या गाठीशी आहे. फेसाळलेल्या समुद्रकाठी बोचणाऱ्या थंडीचा अनुभव हा मनाला सुखावणारा ठरला आहे. आता कॉलेजच्या कॅम्पसमध्ये व कॅन्टीनमध्ये गरमागरम चहाचे झुरके मारत केलेल्या गप्पा मला आवडतात. सध्या कॉलेजात हॉट टी विथ डिस्कस सुरू आहे. गरमागरम इडली, वडासांबार सकाळच्या थंडीत खाल्ला की, त्यातून येणाऱ्या वाफा यादेखील हव्याहव्याशा वाटतात. यातून आम्ही थंडीचा आनंद घेतो.

गोव्याची आठवण
जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विशाल सिंग याने सांगितले की, थंडी पडल्यावर वातावरणात एक वेगळ्याच प्रकारची जादू पसरल्यासारखे वाटते. त्यामुळे थंडीत मूडही फ्रेश राहतो. या वर्षी थंडी पडल्यावर मी गोव्याला फिरून आलो. दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या स्पॉटचे प्लॅनिंग करीत असतो. मागील वर्षी पुण्यात सिंहगडावर गेलो होतो. पिकनिकला जाऊन एन्जॉयमेंटसोबत समाधानही मिळते. थंडीत मला लाँग ड्राइव्हला जायला खूप आवडते. या माझ्या आयुष्यातील बेस्ट आठवणी आहेत. त्या मी कधीच विसरणार नाही. वातावरणात थंडी जाणवू लागली आहे. ही थंडी अगदी कुडकुडवून टाकणारी नसून मस्त गुलाबी आहे. त्यामुळे या वातावरणाची मज्जा घेता यावी, याकरिता कॉलेजियन्स वेगवेगळे प्लॅनिंग करीत आहेत. कोणी पिकनिक एन्जॉय करून आले आहे. काही जण कॉलेजला जाताना गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत, तर कोणी कॉलेज कॅम्पसमध्ये मारलेल्या गप्पा आणि त्यासोबत कॅन्टीनमधील गरमागरम पदार्थांचा आस्वाद घेत या थंडीचा आनंद लुटत आहेत. काही कॉलेजचे कॅम्प याच महिन्यात जात असल्याने कॅम्पमध्ये कोणी शेकोटीची मज्जाही अनुभवत आहे. त्यामुळे ही हुडहुडी प्रत्येकाच्या आठवणीतील ठरली आहे.

कवी सुस्साट...
गेल्या आठवड्यात व्हॉट्सअपवरही न्यू इअरचा फिव्हर दिसून आला. नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअपवर फोटो्स, मेसेजे्सचा अक्षरश: पाऊस पडला. यावेळी सगळ््यांनीच आपापले डीपीज् आणि स्टेट्स बदलून सर्वांना शुभेच्छा दिल्या. शिवाय, काही आठवड्यांपासून व्हॉट्सअपवर ‘फेव्हरेट’ कवींच्या कविता, चारोळ््याही शेअर होत आहेत. ‘लोग कहते है मेरेको आती नही शेरो-शायरी, आयला ट्रेन ड्रायव्हर को कायकू मारा जब टूटा उपरकी वायरी...जगप्रसिद्ध कवी’ या चारोळीने एकच हशा पिकला. टेस्ट क्रिकेटमधून धोनी घेतलेल्या रिटायमेंटवर व्हॉट्सअपकर हळहळले. अगदी सर्व स्तरांतून वेगवेगळ््या मेसेजे्स आणि फोटोसमधून धोनीला ‘मिस’ केले गेले. त्यावर आलेला ‘३१ डिसेंबरला पार्टीला सोडत नव्हते, म्हणून धोनीने टेस्ट क्रिकेटमधून सन्यास घेतला....वातावरण गंभीर पण धोनी भाऊ खंबीर...’ या मेसेजने धम्माल केली. तसेच, लालबागमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद दिसून आले. त्यामुळे वेगवेगळ््या अफवांचे पीकच व्हॉट्सअपवर दिसून आलं. आणि ‘पीके’सुद्धा व्हॉट्सअपवर हीट ठरला...त्यात ‘पीके’तल्या आमीरचा फोटो एडिट करुन विराट आणि अनुष्काच्या नव्या कॉमेडी ‘व्हिके’चित्रपटाचा घाट घातला आहे. त्याचप्रमाणे, या फिल्मवर वेगवेगळ््या जोक्सने व्हॉट्सअपवर धुमाकूळ घातला आहे.

कॉलेजच्या कट्ट्यावरची धम्माल, ‘ती’ कॉलेजमध्ये कधी येईल यासाठी तासनतास गेटकडे डोळे लावून बसणं, कॉलेजमधल्या ‘मामा’सोबतची आपली दोस्ती, मित्रांबरोबर बंक केलेली लेक्चर्स, त्यासाठी प्रोफेसरांना दिलेली खोटी कारणं, मित्रांनीही केलेली प्रॉक्सीची मदत... असे मौज आणि मस्तीने भरलेले ते कॉलेजचे क्षण... या आणि अशा तुमच्या धम्माल गोष्टी शेअर करण्यासाठी ‘लोकमत’ने स्पेशली तुमच्यासाठी आणलाय हक्काचा प्लॅटफॉर्म... पाठवा तुमच्या हटके आठवणी ’ङ्म‘ें३ूेंस्र४२@ॅें्र’.ूङ्मे या ई-मेल आयडीवर.

Web Title: Winter, fire and mood ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.