Join us

हुडहुडी भरविणारी थंडी ठरतेय ‘किलर’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 7:31 AM

जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या तापमानात वाढ होत असतानाच, २०१० ते २०१८ या काळात देशातल्या थंडीच्या लाटेत तब्बल ५०६ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.

- सचिन लुंगसेमुंबई : थंडी कितीही गुलाबी अथवा आल्हादायक वाटत असली, तरीदेखील भारतीय हवामान शास्त्र विभागाकडील आकडेवारीनुसार, १९८० सालापासून २०१८ पर्यंत म्हणजे ३९ वर्षांपैकी २२ वर्षांत आलेल्या उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत थंडीच्या लाटेने अधिक बळी घेतले आहेत. जागतिक तापमानवाढीमुळे जगाच्या तापमानात वाढ होत असतानाच, २०१० ते २०१८ या काळात देशातल्या थंडीच्या लाटेत तब्बल ५०६ टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली आहे.मुंबईसह राज्यभरात कडाक्याची थंडी पडली असून, उत्तर भारतात तर कडाक्याच्या थंडीने कहर केला आहे. उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत १९९२ साली थंडीच्या लाटेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे प्रमाण ४१ पट अधिक आहे. २०१० ते २०१८ या काळात टेÑंड काहीसा वेगळा होता. या काळात थंडीच्या लाटेमुळे ४ हजार ५०६ लोकांचा मृत्यू झाला आणि उष्णतेच्या लाटेमुळे ५ हजार ५७२ लोकांचा मृत्यू झाला. २०११ साली उष्णतेच्या लाटेच्या तुलनेत थंडीच्या लाटेचे बळी ६० पटीने अधिक होते.हिवाळ्यात सातत्याने पंजाब, हरयाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये कडाक्याच्या थंडी पडत असून, येथे शीत लहरीचे प्रमाण अधिक आहे. येथील किमान तापमान उणे नोंदविण्यात येत असून, विदर्भातही अनेक ठिकाणी एक आकडी किमान तापमानाची नोंद होत आहे.शीत दिवसाची व्याख्या जास्तीतजास्त दिवसाच्या तापमानाच्या आधारावर तर शीत लहरीची व्याख्या सलग दोन रात्री नोंदविलेल्या किमान तापमानावर अवलंबून असते.

टॅग्स :मुंबईहवामान