हिवाळी अधिवेशन सुरू, विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 08:53 AM2018-11-19T08:53:15+5:302018-11-19T11:16:35+5:30

विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

Winter Session begins today, CM Devendra Fadnavis takes aim at opposition | हिवाळी अधिवेशन सुरू, विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत

हिवाळी अधिवेशन सुरू, विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत

Next
ठळक मुद्दे विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता आठ दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे.हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

मुंबई - विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता आठ दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.

अधिवेशनाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ व विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. दुष्काळासह राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, त्यावर विस्तृत चर्चेसाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असायला हवा होता. मात्र ही चर्चा टाळण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचे केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

आजवरच्या अधिवेशनाची आकडेवारी पाहिली तर, आघाडी सरकारच्या काळात अधिवेशनाचे दिवस कमी असल्याचे दिसून येते; मात्र सरासरी तीनशे तास कामकाज झाल्याचे दिसून येते. तर युती सरकारच्या काळात एकाही वर्षी ३०० तास कामकाज झालेले नाही.

आजवरच्या अधिवेशनातील कामकाज

वर्ष      एकूण दिवस   एकूण अधिवेशने   तास-मिनीट

२०१२         तीन                  ४७                   ३४४.५३
२०१३         तीन                  ४८                   ३२२.३०
२०१४         पाच                 २८                    १७१.९४
२०१५         तीन                 ५१                    २८०.६१
२०१६         पाच                 ५०                    २६३.९१
२०१७         तीन                 ४४                    १८८.९२
२०१८         दोन                 ३५                    २०६.३७


वर्ष        ठिकाण      दिवस एकूण      तास

२०१२      नागपूर           १०                ५३.५३
२०१३      नागपूर           १०                ६७.३०
२०१४      नागपूर           १३                ७६.१७
२०१५      नागपूर           १३                ६३.४६
२०१६      नागपूर           १०                ५१.४०
२०१७      नागपूर           १०                ५७.३५

Web Title: Winter Session begins today, CM Devendra Fadnavis takes aim at opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.