मुंबई - विधीमंडळ आणि विधानपरिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून (19 नोव्हेंबर) सुरुवात होणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. रविवार, ईद आणि गुरुनानक जयंतीच्या सुट्टया वगळता आठ दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. हिवाळी अधिवेशनात दुष्काळ, कर्जमाफी, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि विविध मंत्र्यांवर झालेले आरोप या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरण्याची तयारी विरोधकांनी केली आहे.
अधिवेशनाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून त्यात विधानसभेत प्रलंबित असलेली आठ व विधान परिषदेची दोन प्रलंबित विधेयके मांडण्यात येणार आहेत. अधिवेशनात दुष्काळावरची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. दुष्काळासह राज्यातील अनेक समस्यांनी उग्र रूप धारण केले असून, त्यावर विस्तृत चर्चेसाठी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी किमान तीन आठवड्यांचा असायला हवा होता. मात्र ही चर्चा टाळण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक अधिवेशन केवळ दोन आठवड्यांचे केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.
आजवरच्या अधिवेशनाची आकडेवारी पाहिली तर, आघाडी सरकारच्या काळात अधिवेशनाचे दिवस कमी असल्याचे दिसून येते; मात्र सरासरी तीनशे तास कामकाज झाल्याचे दिसून येते. तर युती सरकारच्या काळात एकाही वर्षी ३०० तास कामकाज झालेले नाही.
आजवरच्या अधिवेशनातील कामकाज
वर्ष एकूण दिवस एकूण अधिवेशने तास-मिनीट
२०१२ तीन ४७ ३४४.५३२०१३ तीन ४८ ३२२.३०२०१४ पाच २८ १७१.९४२०१५ तीन ५१ २८०.६१२०१६ पाच ५० २६३.९१२०१७ तीन ४४ १८८.९२२०१८ दोन ३५ २०६.३७
वर्ष ठिकाण दिवस एकूण तास
२०१२ नागपूर १० ५३.५३२०१३ नागपूर १० ६७.३०२०१४ नागपूर १३ ७६.१७२०१५ नागपूर १३ ६३.४६२०१६ नागपूर १० ५१.४०२०१७ नागपूर १० ५७.३५