Winter Session Maharashtra : मुलाला जे शक्य आहे ते करतो, बापाला जे द्यायचं असेल ते देईल- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:12 PM2018-11-19T12:12:48+5:302018-11-21T13:23:04+5:30
मुंबईः विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला (19 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही आरक्षणाच्या ...
मुंबईः विधिमंडळ आणि विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाला (19 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशीही आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधक विधानभवनाच्या आवारात घोषणाबाजी देत आहे. विधानसभेचं कामकाजही दोनदा तहकूब करण्यात आलं होतं. दुसऱ्या दिवशी काही सदस्यांनी राजदंडही पळवून नेण्याचा प्रयत्न केला. कामकाज सुरू होण्यापूर्वी विधान भवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्य सरकारविरोधी पोस्टर्स फडकावत घोषणाबाजी केली.
तसेच मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचीही मागणी लावून धरली. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चंद्रकांतदादा पाटलांनी भाष्य केलं आहे. धनगर आरक्षणाबाबतचा टीस अर्थात टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसचा अहवाल आला असून, पत्र लिहून केंद्राला कल्पना दिली आहे. मुलाला जे शक्य आहे ते त्यानं केलं आहे. आता बापानं जे द्यायचं ते देईल असं चंद्रकांतदादा पाटील म्हणाले आहेत. धनगर समाजाचा अहवाल पटलावर ठेवावा, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आरक्षण देतो, असं सांगितलं होतं, परंतु आता त्यांनी चेंडू केंद्राकडे टोलवला आहे.
शिक्षणाच्या बाबतीत 5 टक्के मुस्लिमांना दिलेलं आरक्षण हायकोर्टानं मान्य केलं आहे, मराठा समाजालाही आरक्षण मिळालंच पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी मराठा आरक्षण न्यायालयात टिकण्याचा सोपा मार्ग सुचवला आहे. ओबीसी प्रवर्गात उप प्रवर्ग तयार करून आरक्षण द्या. ओबीसीतून उप प्रवर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, जेणेकरून ते न्यायालयात टिकेल, असं राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारनं दिलगिरी व्यक्त केली आहे. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी सरकारनं कोणताही संपर्क साधला नाही. त्याबद्दल चंद्रकांतदादा पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
04:29 PM
मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा करण्यापेक्षा सभागृहात विधेयक आणावं, गणपत आबांचा एल्गार
माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असे वक्तव्य सभागृहाबाहेर केलं. पण, आरक्षणाचा अहवाल आला असून तो ताबडतोब सभागृहात ठेवावा. मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा करण्यापेक्षा या संबंधीचं विधेयक सभागृहात ठेवावं, अशी मागणी ज्येष्ठ नेते, आमदार गणपत आबा देशमुख यांनी केली आहे.
04:17 PM
पळवापळवी, फेकाफेकी... मुस्लिम आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ
मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ झाला असून, मुस्लिम आमदार आक्रमक झाले आहेत. मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लिम आमदारांनी दोनदा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विधानसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे.
11:28 AM
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी
Maharashtra: Members of Opposition including Congress and NCP leaders stage protest outside Vidhan Bhavan demanding loan waiver for farmers. pic.twitter.com/hiyYkvDUfr
— ANI (@ANI) November 20, 2018
02:07 PM
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारनं व्यक्त केली दिलगिरी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारनं दिलगिरी व्यक्त केली आहे. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी सरकारनं कोणताही संपर्क साधला नाही. त्याबद्दल चंद्रकांतदादा पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
01:38 PM
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन
दुष्काळ निवारणासाठी सरकारकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याचं सांगत विरोधी पक्षनेत्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली आहे. तसेच सरकारच्या विरोधात प्रदर्शन केलं आहे.
12:58 PM
...जेव्हा विद्याताई चव्हाण थांबवून रावतेंना जाब विचारतात
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना थांबवून ओला-उबर चालकांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला आहे.
12:19 PM
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या
समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नव्हता, समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
12:18 PM
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
दुष्काळग्रस्तांना मदत द्या, शेतकऱ्यांचं 2018 च्या खरिपापर्यंत कर्ज माफ करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, मुस्लिम, मराठा ,धनगर समाजाला आरक्षण द्या, या मागण्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी केल्या आहेत.
12:16 PM
आम्ही सरकारचे बुरखे टराटरा फाडणार
महत्त्वाच्या घोषणा अधिवेशनात करायच्या असतात, मागास वर्ग आयोगाचा अहवाल काय आहे, माहीत नाही. सरकार शब्दांची फसवणूक करत आहे. आम्ही सरकारचे बुरखे फाडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले आहेत.