20 Nov, 18 04:29 PM
मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा करण्यापेक्षा सभागृहात विधेयक आणावं, गणपत आबांचा एल्गार
माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल, असे वक्तव्य सभागृहाबाहेर केलं. पण, आरक्षणाचा अहवाल आला असून तो ताबडतोब सभागृहात ठेवावा. मुख्यमंत्र्यांनी बाहेर घोषणा करण्यापेक्षा या संबंधीचं विधेयक सभागृहात ठेवावं, अशी मागणी ज्येष्ठ नेते, आमदार गणपत आबा देशमुख यांनी केली आहे.
20 Nov, 18 04:17 PM
पळवापळवी, फेकाफेकी... मुस्लिम आरक्षणावरून विधानसभेत गदारोळ
मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून विधिमंडळात गदारोळ झाला असून, मुस्लिम आमदार आक्रमक झाले आहेत. मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवरून मुस्लिम आमदारांनी दोनदा राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विधानसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मुस्लिम आरक्षणावरून राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला आहे.
20 Nov, 18 11:28 AM
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी
19 Nov, 18 02:07 PM
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारनं व्यक्त केली दिलगिरी
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सरकारनं दिलगिरी व्यक्त केली आहे. विधान परिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांशी सरकारनं कोणताही संपर्क साधला नाही. त्याबद्दल चंद्रकांतदादा पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
19 Nov, 18 01:38 PM
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन
दुष्काळ निवारणासाठी सरकारकडे कोणताही ठोस कार्यक्रम नसल्याचं सांगत विरोधी पक्षनेत्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली आहे. तसेच सरकारच्या विरोधात प्रदर्शन केलं आहे.
19 Nov, 18 12:58 PM
...जेव्हा विद्याताई चव्हाण थांबवून रावतेंना जाब विचारतात
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रवादीच्या आमदार विद्याताई चव्हाण यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावतेंना थांबवून ओला-उबर चालकांच्या प्रश्नाबाबत जाब विचारला आहे.
19 Nov, 18 12:19 PM
समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या
समृद्धी महामार्गाला शिवसेनेचा विरोध नव्हता, समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचे नाव द्या, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
19 Nov, 18 12:18 PM
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
दुष्काळग्रस्तांना मदत द्या, शेतकऱ्यांचं 2018 च्या खरिपापर्यंत कर्ज माफ करा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, मुस्लिम, मराठा ,धनगर समाजाला आरक्षण द्या, या मागण्या विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटलांनी केल्या आहेत.
19 Nov, 18 12:16 PM
आम्ही सरकारचे बुरखे टराटरा फाडणार
महत्त्वाच्या घोषणा अधिवेशनात करायच्या असतात, मागास वर्ग आयोगाचा अहवाल काय आहे, माहीत नाही. सरकार शब्दांची फसवणूक करत आहे. आम्ही सरकारचे बुरखे फाडण्याचा प्रयत्न करणार आहोत, असंही अजित पवार म्हणाले आहेत.