VIDEO : हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालय परिसरात पोलीसच झाले आंदोलक! जाणून घ्या संपूर्ण प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:29 PM2021-12-21T18:29:58+5:302021-12-21T18:31:06+5:30
यावेळी, साध्या कपड्यांवरील पोलिसांनी आंदोलन करायला सुरुवात केली आणि बंदोबस्तावरील पोलीस पथकांनी या आंदोलकाना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण...
मुंबई- हिवाळी अधिवेशन अवघ्या काही तासांवर असल्याने कुठलेही आंदोलन झाले, तर त्याला तोंड देण्यासाठी पोलीस यंत्रणा कशी सज्ज होते, याचे प्रात्यक्षिक नुकतेच मंत्रालय परिसरात बघायला मिळाले. पोलीस यंत्रणा कशाप्रकारे सज्ज आहे, हे तपासण्यासाठी पोलिसांनी येथे 'मॉक ड्रिल' घेतले. यावेळी पोलीसच साध्या कपड्यांवर त्यांच्या योजनेनुसार आंदोलक झाले होते.
हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालय परिसरात पोलीसच आंदोलक झाले अन् आंदोलन केले!#WinterSession#Policepic.twitter.com/mQ6aNw78tU
— Lokmat (@lokmat) December 21, 2021
यावेळी, साध्या कपड्यांवरील पोलिसांनी आंदोलन करायला सुरुवात केली आणि बंदोबस्तावरील पोलीस पथकांनी या आंदोलकाना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक पोलिसांनी बंदोबस्तावरील पोलिसांसोबत बाचाबाची करायला सुरुवात केली. यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत गाडीत बसवले. हे पोलिस यंत्रणा कशाप्रकारे सज्ज आहे, हे तपासण्यासाठी पोलिसांनी केलेले 'मॉक ड्रिल' होते.