आमच्या येथे रेल्वेच्या कृपेने राेज 86 हजार लाेकांना घरी दारी लेटमार्क

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 01:02 PM2023-08-24T13:02:39+5:302023-08-24T13:03:28+5:30

मध्य रेल्वेच्या दररोज १९ लोकल धावतात विलंबाने

With the grace of railways, 86,000 lakhs have been given door-to-door tickets | आमच्या येथे रेल्वेच्या कृपेने राेज 86 हजार लाेकांना घरी दारी लेटमार्क

आमच्या येथे रेल्वेच्या कृपेने राेज 86 हजार लाेकांना घरी दारी लेटमार्क

googlenewsNext

नितीन जगताप, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईचे जीवन हे लोकलवरच अवलंबून आहे. म्हणून तिला लाइफलाइन असे म्हटले जाते. पण हीच जीवनवाहिनी ऐन सकाळी आणि संध्याकाळी खास करून रात्रीच्या वेळेत धावत नसल्याने प्रवाशांचा जीव जातो. सकाळी ऑफिसची वेळ गाठताना त्या नोकरदार प्रवाशाला तारेवरची कसरत करावी लागते. तर संध्याकाळी ऑफिसमधून घर गाठण्यासाठी तो जेव्हा स्टेशनवर येतो तेव्हा तर गाड्यांचे वेळापत्रक कोलमडून गेलेले असते. हे केवळ एक दिवसाचे नाहीतर रोजचे चित्र झाले आहे.

सकाळी ८ टक्के म्हणजे १४ गाड्या तर सायंकाळी ३ टक्के म्हणजे ५ लोकल  एकूण १९ लोकलला लेटमार्क लागत आहे. मध्य रेल्वेची सरासरी ३८ लाख प्रवासीसंख्या लक्षात घेता ८६,४०० प्रवाशांना लेटमार्क  लागतो. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत यंदा सकाळी लोकलचा वक्तशीरपणा चार टक्क्यांनी सुधारला आहे. परंतु संध्याकाळच्या वेळेस त्यात दोन टक्क्यांनी घट झाली आहे. एकूणच वक्तशीरपणा एक टक्क्याने घसरला आहे.

मध्य रेल्वेचा पसारा मोठा आहे. सीएसएमटी ते कर्जत, खोपोली, कसारा, आसनगाव, पनवेल, ठाणे ते तुर्भे, नेरूळ ते खारकोपर दरम्यान लोकल धावतात. दिवसाला  १,८१० लोकल चालविण्यात येतात. यात एसी लोकलच्या ५६ फेऱ्यांचा समावेश आहे. प्रवासाकरिता सर्वात जलद आणि किफायतशीर असल्याने लोकलने सर्वाधिक मुंबईकर प्रवास करतात. मध्य रेल्वेतून दिवसाला सुमारे ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. सकाळच्या गर्दीच्यावेळी  कल्याण, बदलापूरसह ठाणे आणि उपनगरातून मुंबईत कामानिमित्त लाखोंच्या संख्येने मुंबईकर येतात. तर संध्याकाळी घरी जाण्यासाठी पुन्हा लोकलनेच प्रवास करतात. सध्या सकाळच्या गर्दीच्या वेळी  लोकलचा वक्तशीरपणा ९२.१८ तर संध्याकाळच्या वेळी ९६.६१ टक्के आहे. या लोकल उशिराने धावत असल्याने येइल त्या गाडीत शिरण्यासाठी प्रवासी प्रयत्न करतो. यातूनच अपघात होतात.  संध्याकाळच्या वेळेत लोकल वेळापत्रकानुसार धावत नाही. यामुळे प्रवाशांना बराचवेळ प्रवासात घालवावा लागतो. अनेकदा वेळापत्रक सुरळीत ठेवण्यासाठी लोकल रद्द केल्या जातात. त्यामुळे गाड्यांना गर्दी होते. या गर्दीतून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. तसेच गाड्या धिम्या गतीने धावत असल्याने प्रवाशांना विलंब होतो.

  • १,८१० - मध्य रेल्वेवरील रोजच्या लोकल
  • ३८ लाख - सरासरी प्रवासी संख्या
  • १८१ - सकाळी गर्दीच्या वेळी गाड्या
  • ४,५०० - सकाळी एका गाडीतील अंदाजे प्रवासी संख्या
  • १४ - लेटमार्क लागलेल्या गाड्या
  • १८० - सायंकाळी गर्दीच्या वेळी गाड्या
  • ४,००० - सायंकाळी गर्दीच्यावेळी अंदाजे प्रवासी
  • ५ - सायंकाळी लेटमार्क गाड्या


मेल-एक्स्प्रेस गाड्यांची प्रवाशांनी साखळी ओढणे, सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायरमधील तांत्रिक बिघाड, रुळ ओलांडताना (ट्रेसपासिंग) होणारे अपघात यामुळे रेल्वेच्या वक्तशीरपणावर परिणाम होतो.
- शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

गेले काही दिवस लोकल सातत्याने लेट असून प्रवाशांचे हाल होतात. पण रेल्वेला त्याचे सोयरसुतक नाही. दोन ते चार टक्के लोकल लेट असल्याचे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात हा आकडा असून जास्त रेल्वे अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. कर्जत , बदलापूरची लोकल कल्याणला पाऊण तास थांबवली जाते . त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप होत असून रेल्वे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करावी.
- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष उपनगरीय प्रवासी महासंघ

Web Title: With the grace of railways, 86,000 lakhs have been given door-to-door tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.