अंधेरी येथील शेर-ए-पंजाब कॉलनीमधील ‘रोझ बडर््स प्ले ग्रुप नर्सरी’ शाळेच्या एका वर्गात रविवारी सकाळी सात वाजता बिबट्या मादीने प्रवेश केला. शाळेला सुट्टी असल्याने मोठा अनर्थ टळला. जवळच्या मैदानातून सोसायटीमध्ये काही वेळ फिरून नर्सरीच्या वर्गात ती शिरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.बिबट्या घुसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्वरित ठाणे वनविभागाची आणि संजय गांधी राष्टÑीय उद्यानातील वनाधिकाºयांची २५ जणांची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तिला पकडण्याची सर्व जय्यत तयारी करण्यात आली.तब्बल १२ तासांनी सायंकाळी सात वाजता टीमने या बिबट्या मादीला पकडले. तिला बेशुद्ध अवस्थेत बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तिच्यावर उपचार करून तिला नॅशनल पार्कात ठेवण्यात येईल, अशी माहिती ठाणे विभागाचे उपवन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.भरवस्तीत बिबट्या आल्याने काही काळ घबराट आणि बघ्यांची गर्दीहीझाली होती. आरे कॉलनीजवळ शेर-ए-पंजाब कॉलनी असल्याने ही बिबट्या मादी तिथून आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सीसीटीव्हीमुळे पकडणे सोपे झाले : नर्सरीमध्ये सीसीटीव्ही असल्याने वर्गाच्या बाहेर जमलेले वनाधिकारी त्यांच्या मोबाइलमध्ये आतमध्ये असलेल्या बिबट्या मादीच्या प्रत्येक हलचालीवर लक्ष ठेवून होते. त्याचा वापर करत शिताफीने वनाधिकारी आणि प्राणीप्रेमींनी बिबट्याला पकडले.
तब्बल १२ तासांनी ‘तिला’ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:30 AM