मुंबई : अर्थसंकल्पातील तरतुदींपैकी जेमतेम ३० टक्केच विकासकामांवर आतापर्यंत खर्च होत असते. त्यामुळे दरवर्षी विकासकामांसाठी राखून ठेवलेली मोठ्या रकमेची तरतूद वाया जात होती. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात पहिल्यांदाच पालिकेने वास्तवदर्शी अर्थसंकल्प मांडून त्यावर अंमलबजावणी तत्काळ सुरू केली आहे. परिणामी मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या सहामाहीत भांडवली खर्चासाठी राखीव २३.७९ टक्के रक्कम विकासकामांवर खर्च करण्यात आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.विकासकामांसाठी राखीव ७० टक्के तरतूद दरवर्षी वाया जात असल्याने ती रक्कम पुढच्या अर्थसंकल्पात दाखवून हा आकडा फुगविण्यात येत होता. मात्र या आर्थिक वर्षात अर्थसंकल्प ३७ हजार कोटींवरून थेट २५ हजार कोटींवर आणण्यात आला. तसेच सन २०१४-३४ या विकास आराखड्यातील तरतुदींसाठी अर्थसंकल्पात निधी राखून ठेवत त्यानुसार कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे भांडवली खर्चासाठी राखीव आठ हजार १२१ कोटी रकमेपैकी ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सुमारे २३.७९ टक्के म्हणजेच १,९३१.९९ कोटी रुपये एवढी रक्कम खर्च झाली आहे. गेल्या वर्षी केवळ दहा टक्केच निधी खर्च झाला होता. नियमित आढावा बैठका व प्रत्येक बैठकीत कृती आराखड्यानुसार झालेली व हाती घेणे अपेक्षित असलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात येत होता. त्यामुळे सहामाहीत इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली, अशी माहिती महापालिकेच्या वित्त खात्याद्वारे देण्यात आली.गेल्या आर्थिक वर्षात ३२ टक्के खर्चभांडवली खर्चासाठी मागील संपूर्ण आर्थिक वर्षात १२,९५७.८३ कोटींची तरतूद केली होती. यापैकी सुमारे ३२.०२ टक्के म्हणजेच ४,१४९.३९ एवढी रक्कम १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या आर्थिक वर्षात खर्च करण्यात आली होती.अशी आहे वाढगेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात भांडवली खर्चासाठी १२,९५७.८३ कोटी रुपये एवढ्या रकमेची तरतूद केली होती. ज्यापैकी १,३१०.७५ कोटी म्हणजेच १०.१२ टक्के भांडवली खर्च ३० सप्टेंबर २०१६ पर्यंतच्या पहिल्या सहामाहीत खर्च झाला. तर या वर्षी भांडवली खर्चासाठी राखीव आठ हजार १२१ कोटी रकमेपैकी ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत सुमारे २३.७९ टक्के म्हणजेच १,९३१.९९ कोटी एवढी रक्कम खर्च झाली आहे.२०१७-१८ या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पात विविध विभागांसाठी केलेल्या तरतुदीपैकी सहा महिन्यांत झालेल्या विकासकामांचा घेतलेला आढावा...रस्ते व वाहतूक विभाग२०१७-१८ मध्ये रस्ते व वाहतूक खात्यासाठी १०७८.६१ कोटी रुपये तरतूद भांडवली खर्चासाठी करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ४४८.०५ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ४१.५४ टक्के एवढी रक्कम खर्च करण्यात आली आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात रस्ते व वाहतूक खात्याच्या भांडवली खर्चासाठी २८८६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ३४.६० कोटी, अर्थात १.२० टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात रस्ते व वाहतूक खात्याच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २८८६ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी सुमारे ४७६ कोटी रुपये म्हणजेच १६.४९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.विकास नियोजन खाते२०१७-१८ मध्ये विकास नियोजन खात्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी ५५१.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ३५२.६४ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ६३.९४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात विकास नियोजन खात्याच्या भांडवली खर्चासाठी ७२२.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत १५८.९३ कोटी, अर्थात २२ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात विकास नियोजन खात्यासाठीच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या ७२२.३७ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी २६१.४६ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ३६.१९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.मुख्य रुग्णालय२०१७-१८ मध्ये प्रमुख रुग्णालयांशी संबंधित भांडवली खर्चासाठी १९०.४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १०७.९३ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ५६.६६ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात प्रमुख रुग्णालयांच्या भांडवली खर्चासाठी २३७.९७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ५४.६९ कोटी, अर्थात १९.९६ टक्के एवढी रक्कम खर्च झालीहोती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात प्रमुख रुग्णालयांच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २३७.९७ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी २०२.८३ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ७४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.प्राथमिक शिक्षण२०१७-१८ मध्ये प्राथमिक शिक्षणविषयक भांडवली खर्चासाठी ३५८.०९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ७९.६६ कोटी रुपये म्हणजेच सुमारे २२.२५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात ३२४.५७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ३०.२२ कोटी, अर्थात ९.३१ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात प्राथमिक शिक्षणविषयक भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या ३२४.५७ कोटी रुपयांच्या तरतुदींपैकी सुमारे १७४.२१ कोटी रुपये म्हणजेच ५३.६७ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.सार्वजनिक आरोग्य२०१७-१८ मध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी ११८.६१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १६.११ कोटी रुपये म्हणजेच सुमारे १३.५८ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात २१९.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ६.६० कोटी, अर्थात ३.०१ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात सार्वजनिक आरोग्य खात्याच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २१९.५९ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी सुमारे ३९.५३ कोटी रुपये म्हणजेच १८ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.पूल विभाग२०१७-१८ मध्ये पूल खात्याच्या भांडवली खर्चासाठी २२०.८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ६२.२७ कोटी रुपये म्हणजेच सुमारे २८.२० टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पूल खात्याच्या भांडवली खर्चासाठी ४३७.१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत ३७.४७ कोटी, अर्थात ८.५७ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात पूल खात्याच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या ४३७.१९ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी सुमारे ९१.०६ कोटी रुपये म्हणजेच २०.८३ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.घनकचरा व्यवस्थापन२०१७-१८ मध्ये घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या भांडवली खर्चासाठी १९१.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत १८.३० कोटी रुपये म्हणजेच सुमारे ९.५५ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात याच खात्यासाठी २३७.३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत १८.७९ कोटी, अर्थात ७.९२ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात घनकचरा व्यवस्थापनविषयक भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या २३७.३८ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी सुमारे ७६.६७ कोटी रुपये म्हणजेच ३२.३० टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.विकास नियोजन खाते२०१७-१८ मध्ये विकास नियोजन खात्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी ५५१.५६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत ३५२.६४ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ६३.९४ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.२०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात विकास नियोजन खात्याच्या भांडवली खर्चासाठी ७२२.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत १५८.९३ कोटी, अर्थात २२ टक्के एवढी रक्कम खर्च झाली होती.गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षात विकास नियोजन खात्यासाठीच्या भांडवली खर्चासाठी करण्यात आलेल्या ७२२.३७ कोटी रुपयांच्या तरतुदीपैकी २६१.४६ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ३६.१९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला होता.पर्जन्य जलवाहिन्या२०१७-१८ मध्ये पर्जन्य जलवाहिन्या खात्याशी संबंधित भांडवली खर्चासाठी ४४६.३७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापैकी सप्टेंबर २०१७ अखेरपर्यंत २८५.६५ कोटी रुपये म्हणजेच सुमारे ६३.९९ टक्के एवढ्या रकमेचा विनियोग करण्यात आला आहे.
सहामाहीतच विकासकामांचा बार, पालिकेचा दावा, अर्थसंकल्पातील २३ टक्के रक्कम खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 5:56 AM