मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप गरुवारी दुपारी मागे घेण्यात आला. मुख्य सचिवांनी मागण्यांबाबत ठोस आश्वासन दिल्याने संप मागे घेत असल्याचे कर्मचारी नेत्यांनी सांगितले.सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी राज्यातील १७ लाख कर्मचाºयांनी मंगळवारपासून तीन दिवसीय संप पुकारला होता. या संपाला अडीच दिवस मोठा प्रतिसाद मिळाल्याने सरकारी कामकाज ठप्प झाले होते. संपकºयांच्या नेत्यांनी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि मुख्य सचिव दिनेशकुमार जैन यांच्याशी काल केलेली चर्चा निष्फळ ठरली होती. जैन यांनी गुरुवारी पुन्हा या नेत्यांशी चर्चा केली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष विश्वास काटकर यांनी लोकमतला सांगितले की, जानेवारीमध्ये जाहीर झालेली महागाई भत्त्यातील वाढ दिवाळीपूर्वी देण्याचे आणि १४ महिन्यांची वाढ गणेशोत्सवापूर्वी देण्याचे आश्वासन जैन यांनी दिले. तसेच, वेतननिश्चितीसह सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मान्य केले.मुख्य सचिवांनी ठोस आश्वासन दिल्याने संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तिसºया दिवशी संप अर्ध्यातच मागे घेतला गेल्याने सकाळी कामावर न गेलेले अनेक कर्मचारी दुपारपर्यंत कामावर रुजू होऊ शकले नाहीत.>सामाजिक भावनेतून बंद मागेकर्मचाºयांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून लवकर आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले आहे. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालये चालू राहावीत, जनतेचे हाल होऊ नयेत या सामाजिक भावनेतून बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विश्वास काटकर बैठकीनंतर सांगितले.
अडीच दिवसांत सरकारी कर्मचारी कामावर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 6:31 AM