Join us

विशेष न्यायालयातील साक्षी अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावे; बचावपक्षाची उच्च न्यायालयाला विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 4:41 AM

विशेष न्यायालयात सरकारी वकिलांचे जे साक्षीदार फितूर झाले, त्यांच्या साक्षी अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावे, अशी विनंती ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी केली.

मुंबई : विशेष न्यायालयात सरकारी वकिलांचे जे साक्षीदार फितूर झाले, त्यांच्या साक्षी अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावे, अशी विनंती ज्येष्ठ आयपीएस अधिकारी राजकुमार पांडीयन यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी केली.सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन व सीबीआयने काही आयपीएस अधिकाऱ्यांच्या व हवालदाराच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवर न्या. ए. एम. बदर यांच्या खंडपीठापुढे नव्याने सुनावणी सुरू झाली आहे.ज्या साक्षीदारांनी साक्ष फिरवली आहे, अशा साक्षीदारांची साक्ष अतिरिक्त पुरावे म्हणून ग्राह्य धरावी, अशी विनंती पांडीयन यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने यासंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर करण्याची परवानगी जेठमलानी यांना दिली.मात्र, हे पुरावे उच्च न्यायालयाने पाहणे, हे कायद्याच्या चौकटीत बसते का? असा सवाल करत न्या. बदर यांनी जेठमलानी यांना या शंकेचे निरसन करण्यास सांगितले. ‘हे अर्ज खटला सुरू करण्याआधीचे आहेत.अधिकाºयांविरुद्ध आरोप निश्चित केले जाऊ शकतात की नाही, हे मला पाहायचे आहे. आता आपण आरोप निश्चितीच्या टप्प्यावर आहोत. त्यामुळे या टप्प्यावर पुरावे ग्राह्य धरणे कितपत योग्य आहे? हे मला जाणायचे आहे,’ असे न्या. ए. एम. बदर यांनी यावेळी म्हटले. त्यावर महेश जेठमलानी यांना पुढील सुनावणी असेल त्यावेळी उत्तर द्यायचे आहे.

टॅग्स :मुंबईन्यायालय