नौदलाच्या शौर्याचे साक्षीदार असलेले सी हँरीअर विमान वांद्रे येथील बँडस्टँडवर स्थापित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 02:58 PM2020-12-03T14:58:59+5:302020-12-03T14:59:33+5:30

Sea Harrier aircraft installed : पर्यटनात भर पडण्यासाठी वाहतूक बेटांचे सुशोभिकरण

Witnessing the bravery of the Navy, the Sea Harrier aircraft installed at the Bandstand at Bandra | नौदलाच्या शौर्याचे साक्षीदार असलेले सी हँरीअर विमान वांद्रे येथील बँडस्टँडवर स्थापित

नौदलाच्या शौर्याचे साक्षीदार असलेले सी हँरीअर विमान वांद्रे येथील बँडस्टँडवर स्थापित

Next


भारतीय नौदलातर्फे हस्तांतरण पत्र पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सुपूर्द 

महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई : मुंबईच्या पर्यटनात भर पडण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे वाहतूक बेटांचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. भारतीय नौदलातर्फे देण्यात आलेले सी हँरीअर विमान वांद्रे येथील बँडस्टँडवर बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे   बसविण्यात आले असून या विमानाचे  औपचारीकरित्या हस्तांतरण पत्र  भारतीय नौदलाचे  फ्लॅग ऑफिसर ऑफ महाराष्ट्र श्रीनिवासन यांच्या हस्ते महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचारमंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री  आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी वांद्रे येथील  बॅन्डस्टॅंडवर आयोजित छोटेखानी समारंभात देण्यात आले. 

भारतीय नौदलातून निवृत्त झालेले लढाऊ विमान हे मुंबईला भेट म्हणून मिळाले आहे. मुंबईसाठी ही अनोखी भेट असून यामुळे मुंबईच्या पर्यटन सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. हे विमान वांद्रे बॅन्डस्टॅंड येथील वाहतुक बेटावर ठेवण्यात आले आहे. भारतीय नौदलाकडून हे विमान औपचारीकरित्या मुंबईला आज प्रदान करण्यात आले. भारतीय नौदलाकडून निवृत्त झालेल्या आय.एन.एस. विराट युध्दनौकेवर हे विमान तैनात होते. हे विमान  महानगर पालिकेने बॅन्डस्टॅड येथील वाहतुक बेटावर बसविले आहे. आता सामान्य नागरीकांनाही हे विमान पाहता येणार आहे. प्रजासत्ताक दिन आणि स्वतंत्र दिनाला दरवर्षी या परीसरात शालेय विद्यार्थ्यांचे संचलन होत असते. त्यामुळे या परीसरात भारतीय सामर्थ दाखविणारे हे विमान ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक आसिफ झकेरिया, उपायुक्त (परिमंडळ -३) पराग मसुरकर, एच /पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Witnessing the bravery of the Navy, the Sea Harrier aircraft installed at the Bandstand at Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.