वो सिकंदर... ४० गदा, २४ बुलेट अन् 'थार' जिंकलेला हमालाचा पोरगा, भारतीय सैन्यातील जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 09:39 PM2023-01-16T21:39:44+5:302023-01-16T21:42:57+5:30

कुस्तीचं जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा... या मथळ्याखाली हा लेख लिहण्यात आला होता. त्यातूनच सिकंदरच्या संघर्षाची आणि सैन्य दलातील भरतीची कथा समोर आली. 

Woh Sinkdar... Thar, 40 Mace, 24 Bullet won attack boy, army trooper wrestler sikandar shaikh | वो सिकंदर... ४० गदा, २४ बुलेट अन् 'थार' जिंकलेला हमालाचा पोरगा, भारतीय सैन्यातील जवान

वो सिकंदर... ४० गदा, २४ बुलेट अन् 'थार' जिंकलेला हमालाचा पोरगा, भारतीय सैन्यातील जवान

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा निकाल शनिवारी लागला आणि सोशल मीडियावर सिकंदर नावाचे वादळ घोगवले. पै. सिकंदरवर पंचांकडून अन्याय झाल्याची भावना सोशल मीडियातून व्यक्त होऊ लागली. तर, हार कर जितनेवाले को सिकंदर कहत है... अशा पोस्टही व्हायरल झाल्या. त्यामुळे, पंचांच्या निर्णयावर कुस्तीविश्वात आणि सोशल मीडियातून प्रश्नचिन्ह उभा होत आहे. आता, सिकंदर नेमका कोण, यासाठीही गुगलवर शोधाशोध सुरू झाली. त्यातच, सिकंदर शेख यांच्याव पै. मतिन शेख यांनी लिहिलेला एक लेखही सोशल मीडियात व्हायरल झाला. कुस्तीचं जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा... या मथळ्याखाली हा लेख लिहण्यात आला होता. त्यातूनच सिकंदरच्या संघर्षाची आणि सैन्य दलातील भरतीची कथा समोर आली. 

महाराष्ट्र केसरी स्पर्धेत माती विभागातून महेंद्र गायकवाड व सिकंदर शेख, तर गादी विभागातून हर्षवर्धन सदगीर व शिवराज राक्षे यांनी दमदार कामगिरी करताना महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. या फेरीत दोन्ही गटातील मल्ल एकमेकांशी लढले. मात्र, महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांची कुस्ती वादाचा विषय ठरली. या लढतीतील पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित होत आहेत. महेंद्र गायकवाडने सेमीफायनलमध्ये जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, चर्चा सिकंदरच्या पराभवाचीच झाली. त्यांतर, सिकंदरच्या वडिलांनीही अश्रू ढाळत आपला संघर्षकाळ सांगितला. हमाली करुन पोराला शिकवलंय, आम्हा गरिबावर अन्याय झाला, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.  

अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आणि गरिबीतून सिकंदरने कुस्तीतला प्रवास करत आपलं प्रस्थ निर्माण केलंय. आज लाखो कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील तो ताईत बनला आहे. सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. कुस्तीत जिंकलेल्या इनामावरच लग्नानंतर त्यांचं जगणं सुरू होते. मात्र, दोन मुलांच्या जन्मानंतर, बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले. म्हणून, त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा सुरू केली. मात्र, आता कुस्तीचा शौक ते आपल्या मुलांत पाहू लागले. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते. 

मुलगा सिंकदर चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. पण, वडीलांना आजाराने गाठले सिकंदरच्या खुराकाला पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडिलांच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या २५ व्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे. 

सैन्य दलात भरती वडिलांचे स्वप्न पुर्ण

आपल्या वडीलांच्या, भावाच्या पाठीवर असलेले हमालीचे ओझे कमी व्हावे, घरातले दारिद्र हटावे यासाठी रक्ताचे पाणी करणारा सिकंदर अलीकडेच २०१९ मध्ये भारतीय लष्करात भरती झाला आहे. सैन्यदलाकडून खेळत तो अनेक मैदाने जिंकत आहे. आपला मुलगा मोठा मल्ल बनावा ही वडीलांची इच्छा त्याने पुर्ण केली आहे. पुण्यातील BEG खडकी येथील आर्मी कॅम्पात जॉईन झाल्यानंतर त्याने भारतीय सैन्य दलाच्या पोशाखातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.  

२४ बुलेट, ४० गदा जिंकणारा पैलवान

आता पर्यंत देशभरात कुस्त्या लढून सिंकदरने बक्षिसांची लयलूट केली आहे. यामध्ये एक महिन्द्रा थार चारचाकी, एक जॉन डिअर ट्रक्टर, चार अल्टो कार, चोवीस बुलेट, सहा टिव्हीस, सहा सप्लेंडर तर तब्बल चाळीस चांदी गदा त्याने आपल्या नावावर केल्या आहेत.
 

Web Title: Woh Sinkdar... Thar, 40 Mace, 24 Bullet won attack boy, army trooper wrestler sikandar shaikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.