Join us

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर झालेल्या वादातून तरुणीची आत्महत्या

By admin | Published: January 17, 2016 3:50 AM

व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर मित्रमैत्रिणींसोबत चॅट करताना झालेल्या वादातून निराश झालेल्या गोवंडी येथील निशा भागवत या २२वर्षीय तरुणीने आपण आत्महत्या करीत असल्याचे मेसेज पाठवून इमारतीच्या

मुंबई : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर मित्रमैत्रिणींसोबत चॅट करताना झालेल्या वादातून निराश झालेल्या गोवंडी येथील निशा भागवत या २२वर्षीय तरुणीने आपण आत्महत्या करीत असल्याचे मेसेज पाठवून इमारतीच्या १२व्या मजल्यावरून उडी घेतली. यात ती जागीच मृत्युमुखी पडली. शुक्रवारी मध्यरात्री देवनार गाव परिसरात ही घटना घडली. निशा भागवत चेंबूरच्या वाशी नाका परिसरात राहत होती. गेल्या वर्षभरापासून ती देवनार गाव परिसरातील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये राहणारे असिम गांधी यांच्या घरी घरकाम करत होती. दोन महिन्यांतच तिचा विवाह होणार होता. दरम्यान, व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर चॅटिंग करताना तिचे मित्रमैत्रिणींसोबत वाद झाले होते. विवाहावरून तिच्या मैत्रिणींनी केलेली शेरेबाजी सहन न झाल्याने तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. यासंबंधीचे मेसेजही तिने ग्रुपवर टाकले होते. तिने आत्महत्या केल्याचे इमारतीच्या सुरक्षारक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी तिला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याआधीच तिचे निधन झाले होते.