Join us

टेम्पो, भिंतीच्या मध्ये चिरडून महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:19 IST

या प्रकरणी महिलेचे पती साईनाथ कावळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : चुनावाला कंपाउंड येथून नोकरीवरून घरी परतणाऱ्या महिलेचा गेटमधून जाणाऱ्या टेम्पो आणि भिंतीत चिरडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी मोहम्मद अन्सारी या टेम्पोचालकाविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. संगीता कावळे असे मृत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणी महिलेचे पती साईनाथ कावळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चुनावाला कंपाउंड येथे सायंकाळी सव्वासातच्या सुमारास संगीता कावळे कामावरून सुटून घरी जाण्यासाठी गेटमधून बाहेर पडल्या. त्यावेळी एक आयशर टेम्पो गेटमधून कंपाउंडच्या आत शिरत होता. यावेळी टेम्पो गेटला घासत गेल्याने संगीता ह्या मागील स्टॉलची भिंत आणि टेम्पोच्या मधोमध चिरडल्या गेल्या. त्यात त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला गंभीर दुखापत झाली. या अपघातानंतर टेम्पोचालकाने त्यांना मदत न करता तिथून पळ काढला. त्यानंतर रुग्णालयात दाखल करताना त्या बेशुद्ध पडल्या आणि रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी चालक मोहम्मद अन्सारी याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. 

टॅग्स :महिलामृत्यू