महिला डॉक्टरचा आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 05:20 AM2017-12-28T05:20:03+5:302017-12-28T05:20:32+5:30
मुंबई : पश्चिम उपनगरातील अंबोली येथे बुधवारी एका बंद फ्लॅटमध्ये महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली.
मुंबई : पश्चिम उपनगरातील अंबोली येथे बुधवारी एका बंद फ्लॅटमध्ये महिला डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली. डॉ. पूनम सातपुते (वय ४०) असे त्यांचे नाव असून, त्या प्रसूतितज्ज्ञ होत्या. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, मृतदेह कुजलेला असल्याने २ - ३ दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
>२३ डिसेंबरला अखेरचे बोलणे
डॉ. पूनम या अविवाहित होत्या. त्या राहत असलेल्या इमारतीतच अन्य एका फ्लॅटमध्ये त्यांचे आईवडील व भाऊ राहतात. त्या मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होत्या. २३ डिसेंबरला रात्री त्यांच्याशी अखेरचे मोबाइलवर संभाषण झाल्याचे एका सहकारी डॉक्टरकडून सांगण्यात आले. त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळाला असून, त्यामध्ये नैसर्गिक मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे, असे वरिष्ठ निरीक्षक भरत गायकवाड यांनी सांगितले.