मुंबईतील ग्रँट रोडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळून महिला ठार, तिघे जखमी; दुर्घटना कॅमेऱ्यात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:45 PM2024-07-20T15:45:04+5:302024-07-20T15:46:32+5:30

ढिगाऱ्याखाली अडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेने आपले प्राण गमावले आहेत.

Woman killed three injured after part of building collapsed in Grant Road in Mumbai Accident captured on camera | मुंबईतील ग्रँट रोडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळून महिला ठार, तिघे जखमी; दुर्घटना कॅमेऱ्यात कैद!

मुंबईतील ग्रँट रोडमध्ये इमारतीचा काही भाग कोसळून महिला ठार, तिघे जखमी; दुर्घटना कॅमेऱ्यात कैद!

Mumbai Building Collapse ( Marathi News ) :मुंबई शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असतानाच शहरातील ग्रँट रोड येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. या परिसरातील म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला असून या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तसंच ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँट रोड रेल्वे स्थानकाच्या जवळच असलेले रुबिनिसा मंझील या म्हाडाच्या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याचा काही भाग आज सकाळच्या सुमारास कोसळला. त्यामुळे २० ते २२ नागरिक इमारतीत अडकून पडले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आलं. मात्र या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेने आपले प्राण गमावल्याचे स्पष्ट झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार केले जात आहे. 

पावसाळ्यात मुंबई शहरात अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. त्यामुळे प्रशासनाने अशा इमारतींची पाहणी करून रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची गरज असून हीच बाब आज झालेल्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

दरम्यान, मुंबई शहर आणि उपनगरात आज पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच धांदल उडाली. मुंबईसह उपनगर, कल्याण-डोबिंवली तसेच नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 
 
 

Web Title: Woman killed three injured after part of building collapsed in Grant Road in Mumbai Accident captured on camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.