फुलांचा गंध घेतला आणि गळ्यातील सोनसाखळी गमावली; बतावणी टोळीने महिलेला लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 01:41 PM2022-02-09T13:41:09+5:302022-02-09T13:41:56+5:30

दहिसर पश्चिमच्या कांदरपाडा येथील नवानगरमध्ये श्री गणेश जनरल स्टोअर्स नामक कपड्याचे दुकान आहे. ज्याचे मालक त्याच्या वरच्या मजल्यावर राहतात. दुकानाची मालकीण कुसुम गुप्ता या रविवारी काउंटरवर असताना एक अनोळखी इसम त्याठिकाणी आला आणि त्याने त्यांना महिलांचे गाऊन दाखवण्यास सांगितले.

woman lost the gold chain while Smelling flowers in mumbai | फुलांचा गंध घेतला आणि गळ्यातील सोनसाखळी गमावली; बतावणी टोळीने महिलेला लुबाडले

फुलांचा गंध घेतला आणि गळ्यातील सोनसाखळी गमावली; बतावणी टोळीने महिलेला लुबाडले

googlenewsNext

गौरी टेंबकर कलगुटकर -

मुंबई: 'देवाची फुले आहेत किती सुंदर सुगंध येतोय पहा' असे म्हणत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करण्याचा प्रकार रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास दहिसरच्या एम एच बी कॉलनी पोलिसांच्या हद्दीत घडला. याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला असून यात दोघांचा समावेश असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.

दहिसर पश्चिमच्या कांदरपाडा येथील नवानगरमध्ये श्री गणेश जनरल स्टोअर्स नामक कपड्याचे दुकान आहे. ज्याचे मालक त्याच्या वरच्या मजल्यावर राहतात. दुकानाची मालकीण कुसुम गुप्ता या रविवारी काउंटरवर असताना एक अनोळखी इसम त्याठिकाणी आला आणि त्याने त्यांना महिलांचे गाऊन दाखवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी काही कलेक्शन त्याला दाखविले. बोलता बोलता त्याने गुप्तांना सांगितले की मी जवळच दागिन्यांचे दुकान उघडणार आहे, तुमच्या गळ्यातील सोनसाखळीची डिझाईन छान आहे जरा दाखवाल का? त्यावर गुप्ता यांनी गळ्यातील बारा ग्रॅमची चैन त्याच्या हातात दिली. त्याने ती पाहत सोबत आणलेली फुले गुप्ता यांच्या नाकाकडे धरत देवाच्या फुलांचा सुगंध किती सुंदर आहे पहा' म्हटले. गुप्ता यांनी  त्या फुलांचा सुगंध घेतला आणि क्षणभर त्यांना भिरभिरल्या सारखे झाले. काही क्षणानंतर त्या शुद्धीत आल्या तेव्हा त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा त्यांची मुलगी आणि त्या अनोळखी इसमाच्या मागे धावल्या मात्र तो पर्यंत तो गायब झाला होता. सदर इसम हा सराईत असुन त्याने काही दिवसांपूर्वी असाच प्रकार अन्य साथीदारासोबत मिळून चारकोपमध्ये देखील केल्याची माहिती आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अनेकांना ठागल्याचा संशय
'आम्ही जवळच्या परिसरातील सीसीटीव्ही फूतेज पडताळले असुन त्यात सोनसाखळी चोर हा दुकानाबाहेर गेल्यावर त्याचा साथीदार त्याची बाहेर वाट पाहत होता. त्याच्या सोबत तो पळून गेला आणि मागोमाग काही मिनिटांनी तक्रारदार त्याच्या मागे धावताना दिसुन येत आहे. त्यानुसार आमचे पथक त्यांच्या मागावर असुन त्यांनी मुंबईत अशा प्रकारे अनेकांना ठगल्याचा संशय आम्हाला आहे. 
( सुधीर कुडाळकर - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे )

Web Title: woman lost the gold chain while Smelling flowers in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.