बनावट पीएच.डीप्रकरणी महिलेची जामिनावर सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:06 AM2021-07-28T04:06:41+5:302021-07-28T04:06:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये बनावट पीएच.डी. घेऊन सिटी रुग्णालयात कौन्सिलर म्हणून सराव करत असल्याचा आरोप असलेल्या ...

Woman released on bail in fake PhD case | बनावट पीएच.डीप्रकरणी महिलेची जामिनावर सुटका

बनावट पीएच.डीप्रकरणी महिलेची जामिनावर सुटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये बनावट पीएच.डी. घेऊन सिटी रुग्णालयात कौन्सिलर म्हणून सराव करत असल्याचा आरोप असलेल्या स्वप्ना पाटकर यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजूर केला.

न्या. एस. एस. शिंदे व न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने पाटकर यांना त्यांचा पासपोर्ट दंडाधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे निर्देश दिले, तसेच त्यांना २५ हजार रुपयांचा जातमुचलका भरण्याचेही निर्देश दिले.

पाटकर यांच्याविरोधात ८ जून रोजी फसवणूक व क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये बनावट पीएच.डी. घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता.

पाटकर यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, पाटकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात याचिका दाखल केल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांनी आपली छळवणूक केल्याचा आरोप पाटकर यांनी केला आहे. पाटकर यांची जामिनावर सुटका करताना न्यायालयाने त्यांना पोलीस तपासास सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

Web Title: Woman released on bail in fake PhD case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.