महिलांची पाण्यासाठी धावपळ
By Admin | Published: March 1, 2015 10:44 PM2015-03-01T22:44:34+5:302015-03-01T22:44:34+5:30
कर्जत तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या पोशिर गावावर पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.
नेरळ : कर्जत तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून ओळख असलेल्या पोशिर गावावर पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. तेथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी नव्याने बांधण्यासाठी मोडण्यात आल्या, तर नवीन नळपाणी योजनेच्या केवळ जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान,या परिस्थितीमुळे पोशिर गावातील महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी भटकावे लागते.
नेरळ - कळंब रस्त्यावरील पोशिर गाव हे कर्जत तालुक्यातील सर्वाधिक लोकवस्ती असलेले गाव म्हणून परिचित आहे. तेथे पूर्वी सालोख डॅमचे पाणी अडवून ते पाणी विहिरीतून गावात आणले जात होते. विहिरीमध्ये ते पाणी ओतून त्यातून ग्रामस्थांची तहान भागविली जात होती. चार वर्षापूर्वी तेथील विहीर कोसळल्याने काही दिवस पोशिर ग्रामस्थ हे पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करीत होते. (वार्ताहर)