वांद्रे परिसरात एका महिलेचा फोन हरवल्यानंतर तिने याची तक्रार पोलिसात दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास केल्यावर तो स्विगी या फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीच्या बॉयने उचलल्याचे त्यांना समजले. त्यानुसार त्यांनी डिलिव्हरी बॉइजची माहिती मिळवून त्यांच्यापर्यंत पोहोचले. त्याच्याकडे चौकशी केली असता मी तो फोन घेऊन पोलिस ठाण्यात येणार होतो असे उत्तर त्याने दिले.
महिलेने एफआयआर दाखल न करता निव्वळ तो हरविल्याची तक्रार दिल्याने अखेर मराठे यांच्या पथकाने सदर महिलेचा स्विगी बॉयकडून हस्तगत करत तो तिला सुपूर्द केला. त्यासाठी तिने ट्विट करत वांद्रे पोलिसांचे आभार मानले आहेत. फोनमध्ये महत्वाची माहिती होती, असे त्यांनी सांगितले.
मोबाइल चोरीच्या घटनांत वाढदरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोबाइल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.