Join us

कॉल करा 181! संकटात सापडलेल्या महिलांसाठी आता नवीन टोल फ्री नंबर जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 6:09 PM

राज्यातील महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने '181' हा नवा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आणला आहे.

मुंबई : राज्यातील महिलांना संकट काळात तातडीने मदत मिळावी म्हणून महिला व बाल विकास विभागाने '181' हा नवा टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक आणला आहे. वर्षातील बाराही महिने आणि 24 तास हा क्रमांक फक्त महिलांसाठी कार्यरत असेल. हुंडा बळी असो किंवा बालविवाह कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी महिलांना या क्रमांकावर संपर्क साधता येईल. याशिवाय शासनाच्या विविध योजनांची माहिती ही या क्रमांकावरून महिलांना मिळवता येईल.

पंतप्रधानांच्या 'मिशन शक्ती' या योजनेअंतर्गत हा क्रमांक सुरू करण्यात येत आहे. पुढील पंधरा दिवसात तो महिलांसाठी कार्यरत होईल, अशी माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र सरकारमंगलप्रभात लोढामहिला