Join us

पुरुषांपेक्षा स्त्रिया तुलनेने अधिक समंजस; 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 3:23 PM

'सोशल मीडियाची लोकप्रियता आणि वर्क-लाइफ संतुलन साधण्याचा ताण यामुळे आपले सर्वात तरुण नागरिक बेसावध असतात आणि यामुळे काही वेळा ते गरज नसतानाही तीव्र प्रतिक्रिया देतात.'

मुंबई - ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. टाटा सॉल्ट लाइटने केलेल्या ‘एज ऑफ रेज’ या महत्त्वाच्या सर्वेक्षणात सदर निष्कर्ष समोर आला आहे. शहरामध्ये कामाच्या ठिकाणी होणाऱ्या एकूण ताण तणाव आणि चिडचिडेपणा यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला कर्मचारी अधिक समंजसपणे परिस्थिती हाताळतात, असे दिसून आले आहे. कामाच्या ठिकाणी ताण तणावाचे प्रसंग नित्याचे असले तरी, याबाबतीत राग व्यक्त करण्याचे आणि जाणूनबुजून चुका करण्याचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये अधिक आहे. या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांनुसार, सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या महिलांमधील पाचपैकी एका महिलेच्या दृष्टीने (२०%) कामाशी संबंधित समस्या हे संतापाचे मुख्य कारण असले तरी, अनपेक्षित काम पाहिल्यावर संतापाने लाल होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. कामाच्या दिवशी बॉसने काम करायला सांगितले तर ६४% पुरुषांचा संताप होतो, तर या तुलनेत स्त्रियांमध्ये याचे प्रमाण ५८% आहे. बॉसने शुक्रवारी कामासाठी थांबवून घेतल्यास ५७% पुरुषांचा रागाने भडका उडतो, तर या बाबतीत महिलांचे प्रमाण ५२% आहे. याबरोबरच, वाहतूक कोंडीमुळे कामाला जायला उशीर झाला तर ५७% पुरुषांचा संयम सुटून वाहतूक पोलिसांशी किंवा अन्य चालकांशी भांडण होते, तर या तुलनेत महिलांचे प्रमाण ५५%  आहे.

“सध्याच्या काळात महिला विविध प्रकारच्या भूमिका बजावतात. आई, गृहिणी, मुलगी व वर्किंग प्रोफेशनल म्हणून त्या धावपळीचे जीवन जगत असतात आणि त्यांच्या बाबतीत ताणतणाव सर्रास आढळतो. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रामुख्याने शिक्षणाच्या व कामाच्या बाबतीत, कमालीची स्पर्धा आहे. तंत्रज्ञानातील प्रगती व सोशल मीडिया यामुळे ते अधिकाधिक उतावळे ते अति-उतावळे बनत आहेत. कमतरता किंवा अति-खाणे यामुळे मानसिक व शारीरिक ताण वाढत असल्याने आरोग्यपूर्ण व पुरेसा आहार घेऊन संतुलन साधणे आवश्यक असल्याचे डॉ. राजेश पाधी, क्रिटिकल-इंटर्नल मेडिसिन स्पेशलिस्ट, केअर हॉस्पिटल्स यांनी नमूद केले. यासाठी हायपरटेन्शन नियंत्रित करण्याचा एक उपाय म्हणजे लो-सोडिअम सॉल्टचे सेवन करणे. लो सोडिअम सॉल्ट रिफाइंड, आयोडाइज्ड असते व त्यामध्ये पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. अन्य नियमित मिठाच्या तुलनेत त्यामध्ये सोडिअम कमी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

या सर्वेक्षणाच्या अनुसार, पुरुष ‘अनेक वेळा’ ‘टेक रेज’ चे बळी ठरतात. आपला फोन चार्ज करण्यासाठी लावलेला असताना न विचारता कोणी फोनची पिन काढली तर आपण आक्रमक होतो आणि खूप राग येतो, अशी कबुली सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्या पुरुषांपैकी ६४% पुरुषांनी दिली. या बाबतीत महिलांचे प्रमाण ६१% आहे. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले ६९% पुरुष व ६५% स्त्रिया यांची चीडचीड होते आणि वाय-फाय कनेक्शन किंवा इंटरनेट या सेवा अचानक बंद पडल्या तर सर्व्हिस प्रोव्हायडरशी वादविवाद होतात. सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले पुरुष व स्त्रिया यांच्यामध्ये अशाच प्रकारची वैशिष्ट्ये आढळून आली असून, ६६% पुरुष व ६४% महिला यांना दिवसातून एकदा किंवा एकापेक्षा जास्त वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने राग येतो. एज ऑफ रेजचा परिणाम इतरांवरही होतो. ३५% महिलांच्या तुलनेत ४३% पुरुष ऑफिसमधील सहकाऱ्यांवर किंवा बाहेरील व्यक्तींवर राग काढतात.  

सागर बोके, चीफ मार्केटिंग-फूड बिझनेस, टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. यांनी सांगितले, “सोशल मीडियाची लोकप्रियता आणि वर्क-लाइफ संतुलन साधण्याचा ताण यामुळे आपले सर्वात तरुण नागरिक बेसावध असतात आणि यामुळे काही वेळा ते गरज नसतानाही तीव्र प्रतिक्रिया देतात. काही वेळा आपण अतिशय किरकोळ आणि जीवनातल्या लहानश्या त्रासांवर कशा प्रतिक्रिया देतो, ते हलक्याफुलक्या पद्धतीने अधोरेखित करणे, हे गंभीर उद्दिष्ट निश्चित करून हे सर्वेक्षण करण्यात आले. आपल्या देशातील सर्वात लहान वयाच्या लोकसंख्येला अलगदपणे समाजामध्ये व मनुष्यबळामध्ये सहभागी करून घेणे आवश्यक आहे, जेणे करून त्यांना आरोग्यावर परिणाम होऊ न देता योग्य पद्धतीने परिस्थितीशी जुळवून घेता येऊ शकते. एक ब्रँड म्हणून, टाटा सॉल्ट लाइटमध्ये सोडिअमचे प्रमाण १५% कमी आहे आणि त्यामुळे सर्व ग्राहकांना जाणीवपूर्वक आणि पुरेशा – ना कमी, ना जास्त – प्रमाणात मीठ सेवन करण्यास उत्तेजन दिले जाते, जेणे करून ग्राहकांना ताण निर्माण करू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर संयम न सोडता योग्य प्रकारे परिस्थिती हाताळणे शक्य होते. ”बोके यांनी सांगितले, “नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नालॉजी इन्फर्मेशनच्या मते, रागामध्ये झालेली प्रत्येक १पॉइंटची वाढ म्हणजे हायपरटेन्शनमध्ये १२% वाढ झाल्याचे मानले जाते.” 

टॅग्स :महिलासंशोधन