महिलेस सूर्यास्तानंतर अटक; सीबीआयला ५० हजारांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:01 AM2018-05-22T01:01:32+5:302018-05-22T01:01:32+5:30
ही अटक महिला अधिकाºयांनी न करता ती पुरुष अधिकाºयांनी केल्यामुळे ही कायदेशीर तरतुदींची उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
मुंबई : फौजदारी प्रक्रिया संहितेत (सीआरपीसी) महिलांना सूर्यास्त ते सूर्योदय या काळात अटक करू नये, अशी तरतूद असतानाही एका महिलेस रात्री ८ वाजता अटक केल्याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी तपास करणाऱ्या सीबीआय अधिकाºयांनी महिला आरोपीस रात्री ८ वा. अटक केली. आरोपीची दुपारी ३ पासून चौकशी करण्यात येत होती. मात्र, त्यांनी तपासात सहकार्य न केल्याने अटक करण्यात आली, असे सीबीआयचे म्हणणे होते. तसेच आरोपी महिला दुपारी ३.१५ पासूनच सीबीआयच्या ताब्यात होती. त्यामुळे रात्री ८ वाजता अटकेची कारवाई ही केवळ औपचारिकता होती. असाही मुद्दा सीबीआयने मांडला. मात्र, या अटकेच्या वेळी कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झाल्याचा दावा उच्च न्यायालयात करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.जे. कथावाला आणि न्या. श्रीमती भारती एच. डांगरे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्त्यांचा दावा मान्य करून सीबीआयला ५० हजारांचा दंड केला. साक्षीदारास पोलीस ठाण्यात बोलावता येत नाही. त्यांचा जबाब त्यांच्या घरीच घेतला पाहिजे.
शिस्तभंगाच्या कारवाईचे निर्देश...
अटक करणाºया अधिकाºयाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. चौकशीमध्ये दोषी आढळणाºया अधिकाºयाकडून ही दंडाची रक्कम वसूल करण्याची मुभाही उच्च न्यायालयाने दिली आहे. अशा कार्यवाहीमुळे सीबीआयचे अधिकारी यापुढे अशा प्रकारे बेकायदेशीर अटक करण्यास धजावणार नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
ही अटक महिला अधिकाºयांनी न करता ती पुरुष अधिकाºयांनी केल्यामुळे ही कायदेशीर तरतुदींची उल्लंघन झाल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. अटकेच्या वेळी महिला पोलीस अधिकारी उपस्थित होते; हे सीबीआयचे म्हणणे मान्य न करता केवळ उपस्थिती आवश्यक नाही. अटकही महिला अधिकाºयानेच केली पाहिजे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.