महिला कमांडर राजेश्वरी कोरी, अभिलाष टॉमी यांना प्रेरणा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 05:03 AM2019-01-21T05:03:51+5:302019-01-21T05:03:57+5:30

शिडाच्या बोटीने एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे कमांडर अभिलाष टॉमी या नौदलातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सेवा संघातर्फे दिल्या जाणा-या प्रेरणा पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले.

Women Commander Rajeshwari Corey, Excellence Tommy received the inspiration award | महिला कमांडर राजेश्वरी कोरी, अभिलाष टॉमी यांना प्रेरणा पुरस्कार

महिला कमांडर राजेश्वरी कोरी, अभिलाष टॉमी यांना प्रेरणा पुरस्कार

googlenewsNext

मुंबई : शिडाच्या बोटीने पृथ्वी प्रदक्षिणा करणारी आयएनएसव्ही तारिणी ही सर्व महिला सदस्य असलेली पहिली टीम, युद्धनौकेवर तैनात झालेल्या भारतातील पहिल्या महिला अधिकारी कमांडर (निवृत्त) राजेश्वरी कोरी आणि शिडाच्या बोटीने एकट्याने पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करणारे कमांडर अभिलाष टॉमी या नौदलातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र सेवा संघातर्फे दिल्या जाणा-या प्रेरणा पुरस्काराने शनिवारी सन्मानित करण्यात आले.
भारतीय सैन्यदलांशी सर्वसामान्य माणसांची नाळ जोडण्यासाठी मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाने सॅल्यूट इंडिया हा उपक्र म सुरू केला आहे. त्या अंतर्गत झालेल्या या पुरस्कार सोहळ््यात नौदलाच्या अधिकाºयांचा गौरव करण्यात आला. भारतीय सेनादलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा या पुरस्कारांमागील उदेदश आहे. या यशस्वी अधिकाºयांना पुरस्कृत करताना संस्थेला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो आहे, असे आयोजकांनी सांगितले.
आयएनएसव्ही तारिणीच्या सर्व सहा महिला सदस्यांनी नाविक सागर परिक्र मा ही पहिली भारतीय महिला विशेष सफर पूर्ण केली. या टीमचे नेतृत्व लेफ्टनण्ट कमांडर विर्तका जोशी यांनी केले. त्यांच्या टीमतर्फे लेफ्टनण्ट पायल गुप्ता यांनी पुरस्कार स्वीकारला.
कमाण्डर (निवृत्त) राजेश्वरी कोरी या युद्धनौकेवर तैनात झालेल्या पहिल्या भारतीय महिला अधिकारी. त्या सध्या महाराष्ट्राच्या नागरी संरक्षण खात्यात रायगड जिल्ह्यात उपनियंत्रक म्हणून कार्यरत आहेत. तर, कीर्ती चक्र विजेते कमांडर अभिलाष टॉमी हे नौदलातील पायलट आहेत. एकेरी, कुणाच्याही मदतीशिवाय, विनाथांबा सागर परिक्र मा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय ठरले.
>नौदलाची तोंडओळख
या पुरस्कार सोहळ्यापूर्वी डॉ. सचिन पेंडसे या सागरी इतिहासकारांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त संस्थेतर्फेमुंबईच्या वेस्टर्न नेव्हल कमांडच्या मेरिटाईम वॉरफेअर सेंटरचे संचालक कमोडोर श्रीकांत केसनूर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. केसनूर यांनी गेल्या सत्तर वर्षांतल्या भारतीय नौदलाच्या अभिमानास्पद वाटचालीची तोंडओळख त्यांच्या भाषणात करून दिली. तर, पुरस्कार सोहळ्यानंतर ज्येष्ठ पत्रकार समीर कर्वे यांनी कमांडर (निवृत्त) राजेश्वरी कोरी, कमांडर अभिलाष टॉमी आणि लेफ्टनण्ट पायल गुप्ता यांच्याबरोबर मुक्त संवाद साधला.

Web Title: Women Commander Rajeshwari Corey, Excellence Tommy received the inspiration award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.