Join us

महिला, दिव्यांग, ज्येष्ठांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी, मुंबईतील १० रेल्वे स्थानकांवर सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 6:03 AM

पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील १० रेल्वे स्थानकांवर महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे.

मुंबई - पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागातील १० रेल्वे स्थानकांवर महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. पुढील सहा महिने याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी होणार असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्यानंतर या स्वतंत्र खिडक्यांची सोय कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्यात येईल.मुंबई उपनगरीय लोकलवरील पश्चिम रेल्वेतून रोज ३८ लाख प्रवासी प्रवास करतात. यात रोज तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तिकीट खिडक्यांवरील एकाच रांगेत महिलांसह ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांनाही उभे राहावे लागते. याबाबत प्रवाशांनी पश्चिम रेल्वेकडे स्वतंत्र तिकीट खिडकी सुरू करण्याची मागणी केली होती.त्यानुसार महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेवरील ११ स्थानकांवर एकूण १३ तिकीट खिडक्या तर मासिक पासधारकांसाठी पश्चिम रेल्वेच्या २५ तिकीट खिडक्या राखीव ठेवण्यात आल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. तर, सूरत रेल्वे स्थानकातही ही विशेष सोय उपलब्ध करून दिली आहे, असे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले.येथे सोय उपलब्धचर्चगेट, ग्रँट रोड, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली, वसई रोड आणि सूरत. 

टॅग्स :रेल्वेमुंबई बंद