टाटा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 02:20 AM2018-06-04T02:20:57+5:302018-06-04T02:20:57+5:30

परळ येथील टाटा रुग्णालयातील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रूपाली कळकुंद्रे (३१) असे त्या डॉक्टरचे नाव असून तिने रुग्णालयातील निवासस्थानी इंजेक्शनेद्वारे गुंगीच्या औषधांचा ओव्हरडोस घेत स्वत:चे आयुष्य संपविले.

 Women doctor's suicide in Tata hospital | टाटा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या

टाटा रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या

Next

मुंबई : परळ येथील टाटा रुग्णालयातील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरने शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. रूपाली कळकुंद्रे (३१) असे त्या डॉक्टरचे नाव असून तिने रुग्णालयातील निवासस्थानी इंजेक्शनेद्वारे गुंगीच्या औषधांचा ओव्हरडोस घेत स्वत:चे आयुष्य संपविले.
मूळची कोल्हापूरची असणारी रूपाली दोन वर्षांपासून टाटा रुग्णालयाच्या भूलतज्ज्ञ विभागात कार्यरत होती. तिचा पतीही याच रुग्णालयात काम करत आहे. तीन वर्षांपूर्वी रूपालीचा विवाह झाला होता, मात्र ती गेल्या दोन वर्षांपासून नैराश्येच्या गर्तेत असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. यातून शनिवारी सायंकाळी टाटा रुग्णालयातील सहाव्या मजल्यावरील खोलीमध्ये तिने आत्महत्या केली. मात्र काही वेळात तिला भेटण्यास आलेल्या पतीच्या ही बाब निदर्शनास आली. तिला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

नैराश्येतून कृत्य
नैराश्येतून रूपाली हिने हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. तिचा मृतदेह शनिवारी रात्री उशिरा कुटुंबीयांकडे देण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समजेल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे भोईवाडा पोलिसांनी सांगितले.

Web Title:  Women doctor's suicide in Tata hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू