महिला ‘ड्रग पेडलर्स’ पुन्हा सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 05:55 AM2018-01-29T05:55:40+5:302018-01-29T05:55:55+5:30

अमली पदार्थांची विक्री आणि ने-आण करण्यासाठी महिलांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मधल्या काही काळात याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांत पुन्हा महिलांचा यासाठी केला जाणारा वापर वाढला आहे.

 Women 'drug pedalers' reactivated | महिला ‘ड्रग पेडलर्स’ पुन्हा सक्रिय

महिला ‘ड्रग पेडलर्स’ पुन्हा सक्रिय

Next

- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : अमली पदार्थांची विक्री आणि ने-आण करण्यासाठी महिलांचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मधल्या काही काळात याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, गेल्या दीड ते दोन वर्षांत पुन्हा महिलांचा यासाठी केला जाणारा वापर वाढला आहे. त्यामुळे त्या पुन्हा सक्रिय झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यातही वृद्ध महिलांचा या कामासाठी वापर वाढल्याचेही तपास अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर सहज संशय जात नाही, तसेच त्यांना सहजासहजी अटक करणेही शक्य नसल्यानेच त्यांचा वापर केला जातो.

सामाजिक, आर्थिक समस्या कारणीभूत
आपण इतिहास जर पाहिला तर महिला गेल्या अनेक वर्षांपासून ‘ड्रग पेडलिंग’मध्ये आहेत. पूर्वीदेखील अटक महिलांची संख्या अधिक होतीच. मात्र, तेव्हा आणि आताही बहुतेक महिलांची आर्थिक आणि सामजिक परिस्थिती त्यांना या व्यवसायात आणण्यास जबाबदार असल्याचे उघड झाले आहे.
- शिवदीप लांडे, पोलीस उपायुक्त, एएनसी

अलिकडील प्रकरणे

२४ जानेवारी, २०१८ : ओशिवरा पोलिसांनी जसुबाई चावडा (७५) या महिलेला अटक करत २ किलो गांजा हस्तगत केला.

२८ डिसेंबर, २०१७ : अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर
युनिटने आशा उर्फ नम्रता कदम (३५)
या महिलेच्या मुसक्या आवळत, १ लाख ६२ हजार रुपयांचे बंदी असलेले
‘कफ सीरप’ ताब्यात घेतले होते.
२१ डिसेंबर, २०१७ : कुरार पोलिसांनी अर्धा किलो गांजासह साखराबाई काळे (३५) हिला अटक केली.
४ डिसेंबर, २०१७ : वाकोला पोलिसांनी साडेसातशे ग्रॅम गांजासह देवकांत नरहरी (७५) या महिलेला
अटक केली.
५ जुलै, २०१७ : सांताक्रुझमध्ये एका महिलेला ३ किलो गांजासह अटक करण्यात आली.

Web Title:  Women 'drug pedalers' reactivated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.