मुंबई : स्त्रियांनी आव्हानाचा प्रभावीपणे सामना केला. त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली, असे मत मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या अध्यक्षा तनुजा कंसल यांनी व्यक्त केले. मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे गुरुवारी महिला प्रतिनिधी आणि रेल्वे संघटनांच्या सदस्यांसाठी संवादसत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
तनुजा कंसल म्हणाल्या की, स्त्रियांनी शतकानुशतकाच्या जुन्या परंपरा आणि त्याबद्दलचा पूर्वग्रह मोडला आहे. ते पाहून आम्हांला खूप प्रेरणा मिळते. स्त्रियांनी आव्हानात्मक जबाबदाऱ्या स्वीकारून आणि त्यांना प्रभावीपणे काम करून आपली योग्यता सिद्ध केली आहे. स्त्रियांनी आव्हानात्मक प्रवासाचा प्रभावीपणे सामना केला आहे आणि त्या दृढ, आत्मविश्वासपूर्ण व स्वावलंबी बनल्या आहेत, असेही त्या म्हणाल्या.