मुंबई : कोविन डॅशबोर्डनुसार लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध माहितीनुसार ५२ टक्के स्त्री आरोग्य कर्मचारी व ४८ टक्के पुरुष आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या माहितीवरून महिलांचा लसीकरणास चांगला प्रतिसाद आहे, असा दावा मुंबई महापालिकेने केला आहे.महापालिकेने पहिल्या व दुसऱ्या टप्प्यासाठी २३ लसीकरण केंद्रांमध्ये १२५ बूथ कार्यान्वित केलेली आहेत. १३ जानेवारी रोजी लस महाराष्ट्र सरकारकडून पालिकेला प्राप्त झाली. आतापर्यंत ५ लाख ३२ हजार १०० एवढ्या लसीकरण मात्रा प्राप्त झाल्या. १६ जानेवारी रोजी लसीकरणाचा शुभारंभ झाला. पहिला टप्पा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला. या टप्प्यात ९ अद्ययावत लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. १६ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी १ हजार ९५७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.५ फेब्रुवारी रोजी लसीकरणाचा दुसरा टप्पा कोविड आघाडीवर काम करण्याऱ्या इतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आला. दरम्यान, लाभार्थ्यांच्या संख्या व सुलभतेसाठी १४ अतिरिक्त लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली. या केंद्रांची क्षमता दरदिवशी १२ हजार ५०० लाभार्थ्यांना लसीकरण करण्याइतपत वाढविण्यात आली. ६ फेब्रुवारी रोजी पोलीस दलासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.
लसीकरण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे वर्गीकरण- वैद्यकीय अधिकारी- ११,६७९- परिचारिका व पर्यवेक्षक- ५,६१४- इतर वैद्यकीय कर्मचारी- ५,३१६- शास्त्रज्ञ- १९२- वैद्यकीय विद्यार्थी- १,२६१n क्षेत्रीय वैद्यकीय कर्मचारी- १,८९६n प्रशासकीय कर्मचारी- ३,३५५n इतर आरोग्य कर्मचारी- ९,२७०n इतर- ३८,५८३