कोविड सेंटरमध्ये विनयभंग करणारा डॉक्टर बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 06:14 AM2021-03-05T06:14:42+5:302021-03-05T06:14:57+5:30
उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती. औरंगाबाद महापालिकेच्या पद्मपुरा भागातील कोविड सेंटरमध्ये एका महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आयुष डॉक्टरने केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : औरंगाबाद महापालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात एका महिला रुग्णाचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत दिली. तसेच कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी
३१ मार्चपर्यंत मानक कार्यप्रणाली (एसओपी) लागू करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
औरंगाबाद महापालिकेच्या पद्मपुरा भागातील कोविड सेंटरमध्ये एका महिला रुग्णावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका आयुष डॉक्टरने केला. या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी विधानसभेत उमटले. विरोधी पक्ष नेत्यांनी हा मुद्दा उपस्थित करीत सरकारला धारेवर धरले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात निवेदन केले. ते म्हणाले, औरंगाबादच्या रुग्णालयात घडलेली घटना दुर्दैवी आहे. सरकारने ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्याने आरोपी डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले आहे.
अहवालानंतर कारवाई
n प्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात
आली आहे.
n या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे