दादर रेल्वे स्थानकावर प्रसूती झालेली ‘ती’ महिला पळाली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:18 AM2018-12-27T05:18:57+5:302018-12-27T05:19:08+5:30

दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर सोमवारी अचानक एक महिला प्रसूत झाली. गीता दीपक वागारे (२१) असे या महिलेचे नाव असून तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

women news | दादर रेल्वे स्थानकावर प्रसूती झालेली ‘ती’ महिला पळाली

दादर रेल्वे स्थानकावर प्रसूती झालेली ‘ती’ महिला पळाली

Next

मुंबई : दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर सोमवारी अचानक एक महिला प्रसूत झाली. गीता दीपक वागारे (२१) असे या महिलेचे नाव असून तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गीता तिच्या नवऱ्यासह व बाळासह रुग्णालय प्रशासनाला काहीही न कळवता निघून गेल्याचा प्रकार घडला आहे.
गीता तिच्या नवºयासह पुण्याला निघाली होती. दोघे नवरा-बायको ट्रेनची वाट पाहत थांबलेले असताना अचानक गीताला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यामुळे दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवरच गीताची प्रसूती करावी लागली. प्रसूतीनंतर आई आणि बाळाला पुढील उपचारासाठी रात्री २ च्या सुमारास सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयाला कोणतीही माहिती न देता आणि सुरक्षा असतानाही ते निघून गेले. रुग्णालय प्रशासन या प्रकरणी चौकशी करीत आहे.

Web Title: women news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई