मुंबई : एसटी महामंडळाने लागू केलेल्या महिला सन्मान योजनेला एक वर्ष पुर्ण झाले असून, या योजनेचा एसटीला चांगलाच फायदा झाला आहे. कारण या योजनेमुळे राज्यभरात एसटीने प्रवास करणा-या महिला प्रवाशांचा आकडा वाढत असल्याचा दावा एसटी महामंडळाने केला असून, आजघडीला महिला एसटी प्रवाशांच्या आकड्याने १८ ते २० लाखांचा टप्पा गाठला आहे.एसटी महामंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्च २०२३ रोजी महिला सन्मान योजना लागू करण्यात आली होती. महिलांना एसटी तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली होती. सध्या दररोज सुमारे ५५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत आहेत. त्यापैकी १८ ते २० लाख प्रवासी या महिला आहेत.महिला सन्मान योजना लागू होण्यापूर्वी एसटीने प्रवास करणा-या महिलांची संख्या ८ ते १० लाख होती. सध्या महिला प्रवाशांची संख्या १८ ते २० लाख झाली आहे. गेल्या वर्षभरात महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत शासनाने प्रतिपुर्ती रक्कमेपोटी एसटीला तब्बल १ हजार ६०५ कोटी रुपये अदा केले आहेत.
१७ मार्च २०२३ पासून फेब्रूवारी २०२४ पर्यंत महिला सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ५५ कोटी ९९ ला ५७ हजार १६१ झाली आहे.