Join us

महिला विमानचालक रचणार 'विश्व'विक्रम; उत्तर ध्रुवावरून होणार उड्डाण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2021 7:04 AM

मुंबईकर आकांक्षा सोनावणे यांनी सिडनॅहममधून बीकॉम तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमकॉम केले आहे. फ्लाइंग त्या फ्लोरिडामध्ये शिकल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई/नवी दिल्ली : एअर इंडियाच्या महिला विमानचालक शनिवारी विक्रम रचणार आहेत. त्या बोईंग-७७७ एसएफओ-बीएलआर या विमानातून उत्तर ध्रुवावरून उड्डाण करत जगातील सर्वात जास्त  लांबीचा म्हणजे १६ हजार किमीचा हवाई मार्ग पार करणार आहेत. एअर इंडियाच्या ताफ्यात सामील झालेल्या बोईंगच्या या नव्या विमानाचे पहिलेच उड्डाण आहे. महत्त्वाचे म्हणजे या कामगिरीत मुंबईकर आकांक्षा सोनावणे या विमानचालकाचाही समावेश असेल.

मुंबईकर आकांक्षाआकांक्षा यांच्या आई प्रभा साेनावणे यांनी सांगितले की, आकांक्षा २००४ पासून या क्षेत्रात आहे. केबिन क्रू म्हणून आपलं करीअर सुरू केले आणि आता आता आकांक्षा बोईंग ७७७ वर को-पायलट आहे. १६,००० किमीचा हवाई मार्ग एकाच टप्प्यात पूर्ण करणार

सर्व महिला विमानचालक n सर्व महिला विमानचालकांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच उत्तर ध्रुव हवाई मार्गे पार करण्याची मोहीम. n उड्डाणाचे नेतृत्व एअर इंडियाच्या विमानचालक कॅ. झोया अग्रवाल करणार.n पथकात कॅ. आकांक्षा सोनावणे, कॅ. थनमाई पापागारी, कॅ. शिवानी मनहास यांचाही समावेश. 

टॅग्स :एअर इंडिया