राज्यातील महिला पोलिसांना आता ८ तास ड्यूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:15+5:302021-09-25T04:07:15+5:30

महिला पोलिसांना दिलासा राज्यातील महिला पोलिसांना आता ८ तास ड्यूटी महिला पोलिसांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र ...

Women police in the state are now on duty for 8 hours | राज्यातील महिला पोलिसांना आता ८ तास ड्यूटी

राज्यातील महिला पोलिसांना आता ८ तास ड्यूटी

Next

महिला पोलिसांना दिलासा

राज्यातील महिला पोलिसांना आता ८ तास ड्यूटी

महिला पोलिसांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र सरकारने महिला पोलिसांच्या कामाचे तास १२ तासांवरून ८ तासांवर आणण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी दिली आहे. या निर्णयामुळे महिला पोलिसांना दिलासा मिळाला असून, त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तास ड्यूटीचा उपक्रम सुरू केल्यानंतर पोलीस महासंचालक पांडे यांनी पोलीस घटकांनी या निर्णयाबाबत विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिला पोलिसांसाठी आठ तासांची ड्यूटी जाहीर केली होती. त्यापाठोपाठ अमरावती आणि नुकतेच नवी मुंबई पोलिसांनीही असा निर्णय घेऊन अंमलबजावणी केली. अखेर राज्य पातळीवर निर्णय घेण्यात आला असून, संपूर्ण राज्य पोलीस दलातील महिला पोलिसांना ८ तासांची ड्यूटी करायला मिळणार आहे.

पोलीस दलात कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांवर कामाबरोबरच कौटुंबिक जबाबदारीचा भारही आहे. अशात सण-उत्सव बंदोबस्त, गंभीर गुन्हे यानिमित्ताने वर्षभरातून अनेकदा ८ तासांपेक्षा जास्त वेळ कर्तव्य बजावतात. त्यामुळे त्यांची कौटुंबिक जबाबदारी आणि कर्तव्यावर परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे मानसिक ताण वाढत आहे. काही महिला पोलिसांनीही ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिली होती. या निर्णयामुळे आता चार तासांची सवलत मिळाल्याने महिला कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

....

राज्यात मुंबई पोलीस पहिले...

पोलिसांवरील कामाचा ताण लक्षात घेत, १ जानेवारी २०१७ पासून मुंबईतील सर्वच पोलीस ठाण्यात आठ तासांच्या ड्यूटीचा निर्णय तत्कालीन पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांनी जाहीर केला होता. वर्षभर त्याची अंमलबजावणीही झाली. लॉकडाऊनच्या काळात या सेवा बंद होत काही ठिकाणी १२ तास सेवा २४ तास ड्यूटीची पद्धत सुरू केली. अनलॉकच्या काळात पुन्हा काही पोलीस ठाण्यांत ८ तास सेवेला सुरुवात झाली आहे.

Web Title: Women police in the state are now on duty for 8 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.